Team Agrowon
दूध आटवण्यामुळे दूध निर्मिती करणाऱ्या इंद्रियांना विश्रांती मिळते.
पुढील वेतात दूध निर्मितीसाठी लागणारी जीवनसत्वे , खनिजे शरीरामध्ये अधिक प्रमाणात साठुन राहतात.
खाद्यातुन मिळणारी जीवनसत्वे, खनिजे ही दूध निर्मितीसाठी खर्ची न पडता गर्भातील वासराच्या वाढीस उपयुक्त ठरतात.
विण्यापुर्वी गाईची प्रकृती सदृढ होते.
दुधातील गाय किंवा म्हैस विण्यापुर्वी कमीत कमी ६० दिवस अगोदर आटवावी असे केले नाही, तर पुढील वेतात त्या गाय किंवा म्हशीच दुध सध्याच्या वेतात देत असणाऱ्या दुधापेक्षा कमी होत हे लक्षात घ्यावं.
आपल्या गाईची दूध उत्पादन क्षमता किती आहे. त्याप्रमाण कोणती पद्धत वापरावी याच नियोजन करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यान गाय दुधातून आटवावी.