Cow Dung Goods Agrowon
ताज्या बातम्या

Ganesh Festival : पुणे कृषी महाविद्यालयात गोमय वस्तू विक्री केंद्र सुरू

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर महाविद्यालयाच्या देशी गो संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पातील देशी गाईंच्या गोमयापासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणेशमूर्तींच्या विक्री केंद्राचे उद्‌घाटन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचे हस्ते बुधवारी (ता. ६) झाले.

या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मासाळकर, देशी गो संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने, महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धीरज कंखरे आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन विभागातील देशी गो संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पामध्ये देशी गाईंच्या गोमयापासून निर्माण केल्या जात असलेल्या गणेशमूर्ती, रोपांच्या कुंड्या, पणत्या, धूप, गवरी, बायोप्रोम म्हणजेच स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत, दूध, दही, तूप, गोमूत्र, शेण अशी विविध उत्पादने येथे विक्रीस उपलब्ध आहेत.

गोमय गणेशमूर्तींची आगाऊ नोंदणी :

येत्या १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत बुकिंग घेण्यात येईल. त्यानंतर गणेशमूर्ती १९ सप्टेंबरपर्यंत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत पुणे कृषी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील विक्री स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात येतील. ‘कमवा व शिका’ योजनेत सामील विद्यार्थ्यांनी या गणेशमूर्ती देशभरात कुठेही कुरिअरद्वारे पाठवून देण्याची सोयदेखील उपलब्ध करून दिलेली आहे.

गणेशमूर्ती सात इंचांपासून ते बारा इंचांपर्यंत अशा विविध आकारांमध्ये व रुपये ५९९ पासून रुपये ११११ एवढ्या किमतीच्या दरम्यान उपलब्ध आहेत. देशी गाईंपासून उत्पादन केलेली इतरही अनेक उत्पादने विक्री स्टॉलवर उपलब्ध आहेत. गणपती मूर्तींच्या नोंदणी (बुकिंग) करता निखिल जगताप ७३९१९५९१७७ व ऋतुराज पाटील ९८२२६४१३०५ यांच्याशी संपर्क करावा, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

महाविद्यालयाचा देशी गो संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प हा खऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा प्रकल्प आहे. येथे देशी गायींच्या शेणामध्ये गवारीचा डिंक (गवार गम) व मुलतानी माती असे सेंद्रिय पदार्थ वापरून साच्यातून सुबक, सुंदर, एकसंध, पर्यावरण पूरक व पाण्यामध्ये सहज विरघळून खतामध्ये रूपांतर होऊ शकणाऱ्या पवित्र गोमय गणेशमूर्तींचे उत्पादन सुरू केले ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. गोमय गणेशमूर्तीतून गोसेवा, पर्यावरण रक्षण व रोजगार निर्मिती अशी अनेक उद्दिष्टे नक्कीच साध्य होतील.
- शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT