Cotton Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Smart Cotton Project : स्मार्ट कॉटन प्रकल्पातून कापूस प्रक्रियेला सुरुवात

या कापसाच्या गाठी तयार करून त्याची ई-लिलावाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विक्री केली जाणार आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः कृषी विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातील ‘स्मार्टकॉटन’ (Smart Cotton Project) या उपप्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील अकोट तालुक्यात एकता कापूस उत्पादक (Cotton Farmer) शेतकरी गटाने लांब धागा व जास्त रुई उतारा असलेल्या एकाच वाणाचा कापूस उत्पादित (Cotton Production) केला आहे.

या कापसाच्या गाठी तयार करून त्याची ई-लिलावाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विक्री केली जाणार आहे. अशा पद्धतीची कामगिरी करणारा हा जिल्ह्यातील पहिलाच गट ठरल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या गटाने पिकविलेल्या कापसावर प्रक्रिया करण्याचा प्रारंभ विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांच्या हस्ते झाला.

अकोट तालुक्यातील ‘खुशी कॉटस्पिन’ या जिनिंग फॅक्टरीच्या माध्यमातून स्वतंत्र व वेगळ्या मूल्यवर्धित गाठी तयार करण्याचे काम सुरू झाले.

या वेळी ‘स्मार्टकॉटन’चे नोडल अधिकारी जयेश महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, खुशी कॉटस्पिन संचालक नवीन चांडक, स्मार्ट कॉटन ग्रेडर अनंत देशमुख, श्री. गावंडे, श्री. बनचरे तथा मनीष मनभेकर, पुरुषोत्तम धुमाळे, अतुल भारसाकळे, गणेश निगुडे, राजू राजूरकर, दीपक जाधव, किशोर अचपले, ईश्वर बैरागी, सुकेशिनी करवते, रश्मी गरबडे, मिर्झापूर येथील एकता शेतकरी गटाचे प्रमुख उमेश सपकाळ यांची उपस्थिती होती.

या वेळी शेतकऱ्यांचा सत्कार व काट्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिनिंग फॅक्टरीच्या प्रक्षेत्रावर कापसावरील प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालय व खुशी कॉटस्पिनच्या वतीने करण्यात आले होते.

स्मार्टकॉटन प्रकल्पाची उद्दिष्टे

- एकजिनसी, एकसारखा आणि स्वच्छ कापसाचे उत्पादन करून कापूस प्रक्रिया उद्योगाला मूल्यवर्धित कापूस उपलब्ध करून देणे

- कापसाच्या मूल्य साखळीत प्रक्रियेनंतर रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याचा सहभाग वाढवून उत्पादित मूल्यवर्धित कापसाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळून देणे.

- ‘स्मार्टकॉटन’चा ब्रँड विकसित करणे.

- स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि खरेदीदार यांच्या स्तरावर येणाऱ्या समस्यांवर मात करून एकमेकांना पूरक व्यवस्था निर्माण करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT