Jal Jivan Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jivan Scheme : जलजीवन योजनांमध्ये भ्रष्टाचार

Jal Jivan Corruption : जलजीवनच्या योजना २०२४ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते; मात्र अलिबाग तालुक्यात १०३ योजनांपैकी फक्त सात योजनांची कामे पूर्ण झालेली आहेत.

Team Agrowon

Alibaug News : जलजीवनच्या योजना २०२४ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते; मात्र अलिबाग तालुक्यात १०३ योजनांपैकी फक्त सात योजनांची कामे पूर्ण झालेली आहेत. अनेक कामे तर अद्याप सुरूच झालेली नसल्याने या योजनांमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाल्याची कबुली अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याचे पाण्यात कोणी अडथळा निर्माण करत असेल, तर त्यांची गय करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पावसाळी अधिवेशनात शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी जलजीवन योजनांमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी विधान परिषदेत केली होती. यामुळे अलिबाग तालुक्यात पाण्यावरून राजकारण पेटले आहे.

ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे तक्रारी करू लागले आहेत. आमदार दळवी यांनी बुधवारी (ता. १०) जलजीवन योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यात ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदार आणि जि.प.च्या अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा आमदारांसमोर वाचला.

चौकशी अहवाल गुलदस्तात

एका एका कंत्राटदाराने पन्नास-पन्नास कोटींची कामे घेतली असल्याचा आरोप विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी केला होता; तर यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.

त्यामुळे केंद्र शासनाने जिल्हा परिषदेला ९ मार्च रोजी पत्र पाठवून चौकशी करून चार दिवसांत अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते; परंतु हा अहवाल अद्यापही देण्यात आलेला नाही.

रायगड जिल्ह्यात एकूण १,४४४ पेक्षा जास्त ठिकाणी जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. जवळपास १,२०० कोटी रुपयांचा खर्च या कामांवर होणार आहे, पण इतका खर्च करूनही ग्रामस्थांना पाणी मिळेल की नाही हे येणाऱ्या काळात दिसेल. जिल्हा परिषदेमध्ये जलजीवनच्या कामाशी संबंधित प्रत्येक टेबलला ‘पाण्यासारखा’ पैसा खर्च करावा लागत असल्याने अधिकारी, कर्मचारी, शिपाई मालामाल होत आहेत.
- संजय सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhavantar Yojana: सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा

Agricultural Damage: अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टरवर पिकांना फटका

Maharashtra Rain Forecast: उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Beed Railway : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी अहिल्यानगर-बीड रेल्वे धावणार

Rain Crop Damage : पावणेतीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT