Cooperative Bank
Cooperative Bank  Agrowon
ताज्या बातम्या

Cooperative Bank : गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेची मोठी गरुडझेप

Team Agrowon

गडचिरोली : बँकिंग फ्रंटीअर्सतर्फे नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समीटद्वारे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात (Banking Sector) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हा बँकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार यंदा दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (Central Cooperative Bank ) प्राप्त झाला आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षाच्या उत्कृष्ट माहिती संज्ञानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गडचिरोली जिल्हा बँकेला सन्मानित करण्यात आले.  इंदोर येथे नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकिंग समीट आयोजित पुरस्कार कार्यक्रमात नाबार्डचे महाप्रबंधक सुरेश कुमार के यांच्या हस्ते बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी पुरस्कार स्वीकारला. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सतीश मराठे उपस्थित होते.

प्रभू म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेने आदिवासीबहुल या जिल्ह्यातील ग्राहकांना अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाची सुविधा देण्यासाठी सुविधा पुरविल्या.’’
चार हजार कोटींकडे वाटचाल...

‘‘बँकेने जिल्ह्यातील बँक खातेदार शेतकऱ्यांना ५५२५० रुपये डेबिट कार्ड-रुपे केसीसी कार्ड वितरण केले आहे. त्याचप्रमाणे बँकेने मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे १२५०० खातेदारांना आयएमपीएसची सुविधा पुरविली आहे. तसेच बँकेने नुकतेच व्यापारी वर्गासाठी क्युआर कोडची सुविधा दिली आहे. बँकेने ३१ मार्च २०२२ च्या आर्थिक स्थितीवर ३००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. बँक ४००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत आहे,’’ अशी माहिती सतीश आयलवार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Produce : केंद्र सरकार शेतमालाच्या परराज्य खरेदी-विक्रीसाठी करणार कायदा ?

Kolhapur Water Level : कोल्हापूर जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट, तब्बल दोन मीटरने पाणी गेलं खाली

Dairy Business : नोकरी सोडून युवक रमला दुग्ध व्यवसायात

Agriculture Cultivation : इतके अनर्थ केवळ अतिमशागतीने केले

Kolhapur Agriculture Work : वळवाच्या पावसाने शेतीकामांना गती, खरिपासाठी शेतकऱ्यांची धांदल

SCROLL FOR NEXT