Hatnur Dam  Agrowon
ताज्या बातम्या

Dam Water : हतनूर, गिरणातून पाण्याचा विसर्ग कायम

गिरणाचे चार दरवाजे उघडले, अनेक प्रकल्पातील साठा वाढला

टीम ॲग्रोवन

जळगाव : खानदेशात यंदा जुलै महिन्यातच अनेक प्रकल्पांमधील जलसाठा (Water Stck) वाढला आहे. गिरणा नदीवरील चाळीसगाव (जि.जळगाव) नजीकचे गिरणा धरण (Girna Dam) सलग चौथ्या वर्षी १०० टक्के भरेल, अशी स्थिती आहे. यातच तापी नदीवरील हतनूर (ता.भुसावळ) धरणातून (Hatnur Dam) व गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गिरण धरणात रविवारी (ता.१७) सायंकाळी सहा वाजता ९२ टक्के पाणीसाठा झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने दोन दरवाज्यातून अडीच हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र रविवारी पुन्हा चार दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. ७ हजार १२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग त्यातून सुरू आहे.

धरणात शुक्रवारी (ता.१५) रात्री ८९.१२ टक्के पाणीसाठा होता. हा साठा रात्रीतून ९१.८० टक्क्यांवर पोहोचला. अजूनही धरणात आवक सुरू असल्याने धरणाची आणि काठावरील गावांची सुरक्षितता लक्षात घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शुक्रवारी त्याचे दोन दरवाजे एक फूट वर उचलण्यात आले. त्यातून २४७६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते.

सलग चौथ्यांदा भरतेय धरण

गिरणा धरणाच्या बांधकामाला ५४ वर्षे पूर्ण झाली. १९६९ पासून धरण ११ वेळा शंभर टक्के भरले आहे. धरणाचे बांधकाम १९५९ ला सुरू झाले ते दहा वर्षांनी म्हणजे १९६९ ला पूर्णत्वास आले. त्यानंतर १९७३ ला पहिल्यांदा धरण शंभर टक्के भरले. त्यानंतर १९७६, १९८० ते पूर्ण भरले. चौदा वर्षानंतर म्हणजेच १९९४ ला धरणाने शंभरी गाठली. त्यानंतर पुन्हा धरणाने १० वर्ष ब्रेक मारला. २००४ पासून सलग तीन वर्षे धरण पूर्ण क्षमतेने भरले. २०१९ ते २०२१ असे सलग तीन वर्ष धरणाने शंभरी गाठली. यावर्षीदेखील धरण १०० टक्के भरणार आहे. यामुळे चौथ्यांदा धरण शतकी सलामी देणार आहे. धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच सलग चौथ्यांदा धरण शंभरी गाठणार आहे.

गिरणा धरणाने सकाळी नव्वदी पार केल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात आले. धरणात पाणलोट क्षेत्रातून जितका फ्लो येईल तितक्याच पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. विसर्ग कमी जास्त होऊ शकतो.
देवेंद्र अग्रवाल, अभियंता, गिरणा पाटबंधारे, जळगाव

गिरणा धरण दृष्टीक्षेपात

- धरणाची क्षमता...२१,५०० दशलक्ष घनफूट

- धरणाचा मृतसाठा..३००० दशलक्ष घनफूट

- उपयुक्त जलसाठा...१८,५०० दशलक्ष घनफूट

- एकूण लाभक्षेत्र... ६९,००० हेक्टर

- जळगाव जिल्ह्यातील लाभक्षेत्र....५७,२०९ हेक्टर

- जलसिंचनाचे फायदे मिळणाऱ्या तालुक्याची संख्या...०८

हतनूर, मंगरूळमधून विसर्ग

तापी नदीवरील हतनूर धरणातूनही विसर्ग सुरू आहे. त्याचे ३४ दरवाजे उघडे आहेत. तसेच रावेरातील मंगरूळ मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीवरील धुळ्यातील सुलवाडे बॅरेज, नंदुरबारमधील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनही विसर्ग सुरू आहे. धुळ्यातील पांझरा प्रकल्पातूनही सात दरवाज्यांमधून विसर्ग सुरू आहे. तसेच मालनगाव, अमरावती प्रकल्पदेखील यापूर्वीच १०० टक्के भरले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT