Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.

Team Agrowon

नगर ः ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी (Heavy Rain) आणि सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले आहेत, अशा शेतकऱ्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अतिवृष्टीने बाधित २ लाख २ हजार २३६ शेतकऱ्यांच्या १ लाख २१ हजार ६२८.८८ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे बाधित २ लाख ९८ हजार ७१७ शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

१ लाख ८४ हजार १३५.१७ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. तथापि, काही पंचनामे करावयाचे राहिले असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही एखाद्या क्षेत्राचे किंवा गावाचे पंचनामे राहिले असल्यास त्याबाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT