Crop Damage Compensation  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : जळगाव जिल्ह्यात ६३ हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

Team Agrowon

Jalgaon News : जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ६२ हजार ९५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख ७३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. यात पारोळा तालुक्यातील सर्वाधिक ५८ हजार ६७५ शेतकऱ्यांचा‍ समावेश आहे.

२०२२ मध्ये जून ते ऑगस्टदरम्यान भडगाव, चाळीसगाव, जामनेर आणि पारोळा या चार तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला होता. या चारही तालुक्यांतील नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

त्यानुसार राज्य शासनाने जिल्ह्यातील ६२ हजार ९५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख ७३ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. त्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

तालुकानिहाय शेतकरी व मंजूर रक्कम अशी

कजगाव (ता. भडगाव) : शेतकरी-३६, रक्कम-२ लाख २१ हजार ८५०

बहाळ (चाळीसगाव) : शेतकरी-५९२, रक्कम-१९ लाख ९१ हजार ५५०

नेरी बुद्रुक (ता.जामनेर) : शेतकरी-५३, रक्कम-४ लाख २० हजार ३००

मालदाभाडी : शेतकरी-३ हजार ५०७, रक्कम-१ कोटी ३८ लाख ८४ हजार १७०

जामनेर : शेतकरी-५९, रक्कम-२ लाख ९५ हजार ४००

वाकडी : शेतकरी-३७, रक्कम-५८ हजार २२५

तामसवाडी (ता. पारोळा) : शेतकरी-१३ हजार ९११, रक्कम-९ कोटी ४६ लाख २९ हजार ८२०

चोरवड : शेतकरी-१३ हजार ९४४, रक्कम-१ कोटी ८४ लाख ८१ हजार ९३०

पारोळा : शेतकरी-९ हजार ७६१, रक्कम-७ कोटी १५ लाख ९ हजार ८५०

शेळावे : शेतकरी-११ हजार ३३६, रक्कम-८ कोटी ८१ लाख ६१ हजार ३२०

बहादरपूर : शेतकरी-९ हजार ७२३, रक्कम-७ कोटी ३१ लाख ६७ हजार १५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT