Atul Benke Agrowon
ताज्या बातम्या

पोटचाऱ्यांसाठी संपादित जमिनीची भरपाई देणार

‘पोटचाऱ्यांसाठी संपादित जमिनीची भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल,’’ अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

आळेफाटा, ता. जुन्नर ः ‘‘पोटचाऱ्यांसाठी संपादित जमिनीची भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल,’’ अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

आळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीतील पिंपळगाव जोगा कालव्याच्या चाऱ्या (Fodder Land) व पोटचाऱ्यांसाठी संपादित जमिनींची मोजणी (Land Survey) व त्यात असलेल्या हरकती, आक्षेप दुरुस्त्यांसाठी शेतकऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत आमदार बेनके (Atul Benke) यांनी ही माहिती दिली. तहसीलदार रवींद्र सबनिस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, उप-अधिक्षक भूमी अभिलेख अंबादास गांगर्डे उपस्थित होते.

आळे गावातील बाधित शेतकरी, प्रकाश पाटील -भुजबळ, उपसरपंच अॅड. विजय कुऱ्हाडे यांनी हिस्से, पोटहिस्से निश्चित व्हावेत, वहीवाटीप्रमाणे बाधित शेतकऱ्याला मोबदला मिळावा, अशी मागणी केली. या वेळी महसूल, जलसंपदा व भूमी अभिलेख कार्यालयांचे प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

बेनके म्हणाले,‘‘ पिंपळगाव जोगे हा कालवा झाल्या नंतर चाऱ्यांची अपूर्ण कामे, संपादनाचे निश्चितीकरण, मोजणी प्रक्रिया, सातबारा दुरुस्त्या, अशी अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी वारंवार महाविकास आघाडीतील तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार भू-संपादनाची रक्कम निश्‍चित केली आहे. शेतकऱ्यांचा अनेक दिवसांचा प्रश्न प्रलंबित आहे. तो सोडविण्यात येईल.’’

सबनीस म्हणाले, ‘‘सातबारा दुरुस्ती करून देऊ. ज्यांच्या क्षेत्रातून चारी जात नाही, परंतु संपादन झाले आहे, ती दुरुस्ती करू. ज्यांच्या क्षेत्रातून संपादन नाही, परंतु चारी गेली आहे. त्याठिकाणी संपादनाचे शेरे जलसंपदा विभाग अभिप्राय व महसूल वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने टाकण्यात येतील.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra MLC Election 2026: विधानपरिषदेच्या ३ पदवीधर, २ शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणुकीची घोषणा

Serum Biochemistry: पशुरोग निदानामध्ये सीरम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचे महत्त्व

Water Sharing GR: सात वर्षांपूर्वीच्या शासन निर्णयाचा ‘जीआर बाळा’ म्हणून वाढदिवस साजरा!

Flower Market: श्रावणापासूनची फुलांची मागणी गणपती काळातही कायम

Dairy Business: निष्ठा, लळा, उत्कृष्ट नियोजनातून फायदेशीर दुग्धव्यवसाय

SCROLL FOR NEXT