Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : शेतकरी कंपनीच्या नावाखाली नागपूर जिल्ह्यात वसुली

Agriculture News : शेतकरी गट, उत्पादक कंपनीच्या नावावर पारशिवणी येथील शिशुपाल चिखले नामक व्यक्‍तीने वसुली चालविल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.

Team Agrowon

Nagpur News : शेतकरी गट, उत्पादक कंपनीच्या नावावर पारशिवणी येथील शिशुपाल चिखले नामक व्यक्‍तीने वसुली चालविल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भाने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यानंतर संबंधित व्यक्‍तीपासून सावध राहण्याची जाहीर सूचना कृषी विभागाने प्रसारित केली आहे.

विशेष म्हणजे शिशुपाल चिखले सभासद निधीच्या नावावर पैशाची वसुली करताना रोजगाराचे देखील आश्‍वासन देत असल्याचा आरोप आहे.

शेतकरी कंपनी, गट स्थापन करण्याकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे. शेतकरी कंपनीचे सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी ठरावीक रक्‍कम घेतली जाते. त्याची रीतसर पावतीदेखील देण्याची पद्धत आहे.

मात्र पारशिवणी येथील शिशुपाल चिखले नामक व्यक्‍तीने अशाप्रकारची कोणतीही पावती न देता शेतकऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये वसुलीचा सपाटा लावला आहे. पारशिवणी, कळमेश्‍वर, काटोल, नरखेड आणि वर्धा जिल्ह्यातील कारंजा, घाडगे तालुक्‍यांतील शेतकऱ्यांकडून त्याने ही वसुली केल्याची माहिती आहे.

यामध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी मोबाईलवरून कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अशा योजनेबाबत विचारणा केली. त्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. विशेष म्हणजे शेतकरी कंपनी, गटाच्या नावावर वसुली करणाऱ्या या व्यक्‍तीकडून रोजगाराचे देखील आश्‍वासन देण्यात येत आहे.

लोहारीसावंगा तसेच कारंजा घाडगे या भागातून वसुली संदर्भाने तक्रारी आल्या. संबंधित शिशुपाल चिखले नामक व्यक्‍ती प्रत्येकी एक हजार रुपये घेत त्याची कोणतीच पावती देत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सोबतच रोजगार देण्याचे खोटे आश्‍वासनही तो देत आहे. परिणामी संबंधितापासून शेतकऱ्यांनी सावध राहात आपली फसवणूक टाळावी याकरिता जाहीर आवाहन केले आहे. याप्रकरणी लवकरच पोलिस तक्रार करण्याचे प्रस्तावित आहे. ३० ते ३५ लाख रुपयांचा अपहार संबंधितांनी केल्याची शंका आहे.

- रवींद्र मनोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Flowers: कृत्रिम फुलांवरील बंदीची घोषणा हवेतच

Sugar Conference: राज्यस्तरीय साखर परिषदेचे पुण्यात उद्या आयोजन

Pomegranate Farming: डाळिंब उत्पादनात २५ टक्के घटीचा अंदाज

Pune Agriculture: पश्चिम पट्यात पावसामुळे भात पिके तरारली

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणातून विसर्ग वाढविला

SCROLL FOR NEXT