
Raigad Irrigation News : पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या कालव्यामुळे अनेक गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जाते. या पाण्यावर उन्हाळी भातशेतीबरोबरच भाजीपाला, वेलवर्गीय विविध पिकांची लागवड करतात. दुबार शेतीला हेटवणे धरणाच्या कालव्यामुळे पूरक पाणी मिळत असल्याने उन्हाळी भातशेती बहरली आहे.
तालुक्यातील कामार्ली, तळवली, आधारणे, सापोली, शेणे, बोरगाव यांसह खारेपाटातील काही भागात भातशेती, भाजीपाल्याचे उत्पन्न घेत आहेत. कृषी विभागाअंतर्गत ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रापैकी १,७०० ते १,८०० हेक्टरावर उन्हाळी भाताची लागवड केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
पावसाळ्यापेक्षा उन्हाळी भातशेती फायद्याची ठरत आहे. पावसाळ्यात पिकावर रोगराई, अतिवृष्टी, पुराचा शेतकऱ्यांना वारंवार सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळी भातशेती लाभदायक बनली आहे.
हेटवणे कालव्यालगतची हजारो एकर भातशेती उन्हाळ्यात लागवडीखाली असते. हेटवणे धरण सिंचन प्रकल्प निर्मित झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना कालव्याचा फायदा होत आहे.
सध्या भातपीक तयार असून काही ठिकाणी कापणीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी हरभरा, तूर, वाल, व भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.