Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : उत्तर महाराष्ट्र गारठला

देशाच्या उत्तरेकडील राज्यामध्ये गारठा चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांची स्वारी राज्याकडे आल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : देशाच्या उत्तरेकडील राज्यामध्ये गारठा (Cold Weather) चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांची (Cold Wind) स्वारी राज्याकडे आल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानात (Minimum Temperature) घट होत थंडी वाढली आहे. तर कमाल तापमानातही घट झाली आहे. हा गारठा आणखी दोन दिवस कायम राहण्याचे संकेत आहेत.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढल्याने मध्य प्रदेशातील नवगाव येथे शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे झेपावत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी ८.१ अंश, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. नाशिक, अमरावती येथे किमान तापमान ११ अंशांच्या खाली, तर पुणे, औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर येथे तापमान १२ अंशांच्या खाली आले आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान १२ ते २२ अंशांच्या आसपास आहे. राज्याच्या काही भागांत दिवसाही गार वारे वाहत आहे.

उत्तरेकडील थंड कोरड्या वाऱ्यांमुळे दिवसाच्या कमाल तापमानात १ ते ३ अंशांची घट झाली आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा २४ ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. रत्नागिरी येथे कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २०) राज्यात निरभ्र आकाश, कोरड्या हवामानासह किमान तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र

मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली आज (ता. २०) आणखी तीव्र होणार असून, दोन दिवसांत तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.३ (११.३), नगर ३३ (१३.८), जळगाव - (१३), धुळे २९ (८.२), कोल्हापूर ३०.१ (१६.४), महाबळेश्‍वर २४.८(१२.५), मालेगाव - (१८.४), नाशिक २७.७ (१०.४), निफाड २९.८ (८.१), सांगली ३१.२ (१५.२), सातारा २९ (१३.२), सोलापूर ३२.६ (१७.३), सांताक्रूझ ३३.२ (२०.७), डहाणू ३३.७ (१७.५), रत्नागिरी ३४.४ (२०), औरंगाबाद २८.५ (११.१), नांदेड २९.२ (१४.४), परभणी २९.३ (१३.२), अकोला ३१.४ (१३.३), अमरावती ३०.२ (१०.८), बुलडाणा २९ (१३.३), ब्रह्मपुरी ३१.९ (१४.१), चंद्रपूर २८.८ (१४.४), गडचिरोली ३० (१३), गोंदिया २९.२ (१२), नागपूर २९.८ (११.६), वर्धा २९.५ (१३.४), वाशीम ३१.२ (-), यवतमाळ २९ (११.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Village Governance: ग्रामसभा आणि ग्रामस्तरावरची अंमलबजावणी

Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT