Weather Upadte
Weather Upadte Agrowon
ताज्या बातम्या

Weather Upadte : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला

Team Agrowon

पुणे : राज्यात थंडीचा हंगाम (Cold Season) सुरू झाला आहे. किमान तापमानाचा (Minimum Temprature) पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २) राज्यात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान (Dry Weather) राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. किमान तापमानाचा पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २) राज्यात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सून देशभरातून परतताच उत्तरेकडून थंड व कोरडे वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहे. या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. रात्रीपासूनच किमान तापमानात घट होत असून, पहाटे गारठा चांगलाच जाणवू लागला आहे. दिवसभर निरभ्र आकाश व जोरदार वारे वाहत असल्याने कमाल तापमानात मात्र चढ-उतार सुरूच आहेत.

मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात किमान तापमान २० ते २४ अंशांच्या आसपास होते. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १६ अंशांच्या खाली घसरल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे १०.५ अंश, निफाड येथे ११.४ अंश, तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक, औरंगाबाद येथेही तापमानात घट झाली आहे. तर राज्याचे कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान टिकून आहे.

मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३० (१३.३), जळगाव ३२.४ (१३.७), धुळे ३१ (१०.५), कोल्हापूर ३१.१ (१७.७), महाबळेश्‍वर २५.६(१३.५), नाशिक २९.५ (१२.६), निफाड २९ (११.४), सांगली ३१.६(-), सातारा २९.६ (१४.४), सोलापूर ३२ (१६.७), सांताक्रूझ ३४.५ (२०.६), डहाणू ३३.९ (१९), रत्नागिरी ३५ (२०.५), औरंगाबाद २९.७ (१२.५), नांदेड ३१.४ (१६.४), उस्मानाबाद - (१३.८), परभणी ३० (१४.४), अकोला ३१.५ (१६.०), अमरावती ३१.६ (१५.१), बुलडाणा - (१५.६), ब्रह्मपुरी ३१.६ (१७.३), चंद्रपूर ३१.४ (१७.४), गडचिरोली ३१ (१६.६), गोंदिया २९.२ (१५.२), नागपूर २९.८ (१५.६), वर्धा २९.९(१५.८), वाशीम ३०.६ (१६.८), यवतमाळ ३०.५ (१४.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT