Cloudy Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cloudy Weather : ढगाळ वातावरण, अवकाळीने शेतकऱ्यांची वाढवली चिंता

गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांसह द्राक्ष बागांना फटका बसत आहे. यंदा अतिवृष्टीने आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता पुन्हा या बदलत्या वातावरणाने चिंता वाढवली आहे.

Team Agrowon

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आणि काही भागांत अवकाळीच्या सरी कोसळल्या. यात गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांसह द्राक्ष बागांना फटका बसत आहे. यंदा अतिवृष्टीने आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता पुन्हा या बदलत्या वातावरणाने चिंता वाढवली आहे.

सलग दोन दिवस रविवारी (ता. ११) आणि सोमवारी (ता. १२) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. तर दोन्ही दिवशी रात्री अवकाळी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, माढा, बार्शी, माळशिरस या तालुक्यांत हे वातावरण राहिले. पंढरपुरातील कासेगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे क्षेत्र आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य भागात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. आधीच अतिवृष्टीने खरिपात पिकांचे नुकसान झाले. पण आता पुन्हा हा पाऊस आणि ढगाळ वातावरण या पिकांचे नुकसान करण्याची शक्यता आहे. त्यातच थंडीही वाढते आहे.

थंडीचा गहू, हरभऱ्याला काहीसा फायदा होणार असला, तरी पावसाची चिंता आहे. पंढरपूर, बार्शी, उत्तर आणि दक्षिण सोलापुरात द्राक्षाच्या छाटण्या होऊन आता द्राक्ष बागाही सेटिंग अवस्थेत आहेत. डाळिंबावर तेलकट डागसारख्या रोगाची भीती आहे. तर मोहोळ, अक्कलकोट भागात अनेक ठिकाणी आंब्याला चांगला मोहोर लागला आहे.

शेतकऱ्यांचा खर्च वाढणार

या वातावरणामुळे द्राक्षावर डाऊनी, कुजवा रोग येण्याची शक्यता आहे. डाळिंबात तेल्याला वातावरण पोषक होणार आहे. तर गव्हावर तांबेरा रोगाची शक्यता आहे. पिकांच्या या अवस्थेमुळे अर्थात, फवारणी खर्चात वाढ होणार आहे. जवळपास २० ते ३० टक्के शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवरील खर्च वाढणार आहे.

अतिवृष्टीमुळे आम्ही आधीच ज्वारी, गव्हाची उशिरा पेरणी केली. आता अवकाळी पावसाने पुन्हा नुकसान होण्याची भीती आहे.

- अप्पा कोरके, शेतकरी,

गुळवंची, ता. उत्तर सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT