Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : एका कृषी सहायकाकडे १६ गावांचा कारभार

Latest Agriculture News : राज्यात बहुतांशी कार्यालय शासकीय जागेत आणि स्वतःच्या इमारतीत असताना येथील कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतून चालत आहे.

Team Agrowon

Bhandara News : भाड्याच्या खोलीतून कारभार चालणाऱ्या सिहोरा मंडळ कृषी कार्यालयांतर्गत कृषी सहायकांची पदेही रिक्‍त असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषी विभागाने ही पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.

सिहोरा येथील मंडळ कृषी कार्यालयाची व्यथा आणि दशा वेगळीच आहे. राज्यात बहुतांशी कार्यालय शासकीय जागेत आणि स्वतःच्या इमारतीत असताना येथील कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतून चालत आहे. या मंडळांतर्गत खरीप हंगामात भातपिकाखालील क्षेत्र १७,१२२ हेक्टर असते. रब्बी हंगामात देखील ४,८११.९४ हेक्‍टरवर पेरा असतो.

या दोन्ही हंगामांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या कृषी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र पदांचा देखील वानवा असल्याने कृषी विस्ताराचे कामही प्रभावित झाले आहे. या कार्यालयांतर्गत मंडळ कृषी अधिकारी व शिपाई असे प्रत्येकी एक पद भरण्यात आले आहे. कृषी पर्यवेक्षकांची दोन पदे मंजूर असताना एकाच पर्यवेक्षकाच्या भरवशावर येथील कामकाज होत आहे.

परिणामी, ७२ गावांचा कारभार एका कृषी पर्यवेक्षकाच्या माध्यमातून चालवावा लागत आहे. संलग्नित ७२ गावांतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहायकांची १२ पदे मंजूर आहेत. त्यातील पाच पद भरण्यात आली असून, उर्वरित सात पदे रिक्‍त आहेत. देवसर्रा, हरदोली, सिहोरा, कोष्टी, वाहनी या गावांतील शेतकऱ्यांना कृषी सहायकांच्या उपलब्धतेमुळे योजनांचा लाभ मिळतो.

इतर गावांतील शेतकऱ्यांना मात्र यासाठी प्रभारी कर्मचाऱ्यांची गावात येण्याची प्रतीक्षाच करावी लागते. सरासरी एका कृषी सहायकाकडे १६ गावांची जबाबदारी आहे. त्यांच्याकडून पदाला न्याय कसा मिळेल, याविषयी साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

रिक्‍त पदे भरण्यासाठी मांडवी सरपंच मनीषा ढबाले, मांगली सरपंच शुभांगी पारधे, स्नेरा सरपंच योगराज तेंभरे, धनेगाव सरपंच धनराज उईके, सिदपुरी सरपंच स्वप्नील बोरकर यांच्याद्वारे ग्रामसभेचा ठराव घेत कृषिमंत्री धनंजय मुंडे व शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT