Maharashtra Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain : शुक्रवारपासून विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या सरींची शक्यता

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला होता.

Team Agrowon

Maharashtra Rain News : हवामान विभागाने आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला होता. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात हलक्या, मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला होता. तर मराठवाड्यातील बीड, धारिशिव, लातूर आणि नांदेड तसेच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट होता. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तसेच राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या. पण जोरदार पाऊस नव्हता.

हवामान विभागाने उद्या म्हणजेच गुरुवारी मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशत ठिकठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज दिला. तर शुक्रवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांसाठी शुक्रवार आणि शनिवार काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

शुक्रवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कही ठिकाणी विजांसह लहलका सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT