Agricultural Economey
Agricultural Economey Agrowon
ताज्या बातम्या

Bamboo Farming : केंद्रीय संस्था आणि फिनिक्स फाउंडेशनमध्ये सामंजस्य करार

Anil Jadhao 

लातूर ः देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रातील अधिकारी, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी कृषी मंत्रालयाच्या अधिपत्याखालील हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था आणि बांबू लागवड (Bamboo Farming) चळवळीचे प्रणेते पाशा पटेल (Pasha Patel) यांची फिनिक्स फाउंडेशन संस्था (Pheonix Foundation) यांच्यात बुधवारी (ता. २८) सामंजस्य करार झाला आहे.

‘मॅनेज’ या संस्थेसोबत बांबूवरील देशातील हा पहिलाच करार असून, यापुढे आता भारत सरकार आणि पाशा पटेल हे एकत्रितपणे बांबूवर आधारित सर्व कार्यक्रम राबविणार आहेत.

या सामंजस्य करारावर ‘मॅनेज’चे महासंचालक डॉ. पी. चंद्रशेखरा आणि फिनिक्स फाउंडेशनचे पाशा पटेल यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या प्रसंगी ‘मॅनेज’चे संचालक डॉ. सुवर्णा, डॉ. के. सी. गोलमट, सहसंचालक अलोका राणी, डॉ. विनिता घुमार, डॉ. भास्कर, गुणीप्रकाश ठाकूर (पंतप्रधान एमएसपी समितीचे सदस्य, हरियाना), संजय करपे यांची उपस्थिती होती.

‘मॅनेज’ संस्था आणि फिनिक्स फाउंडेशन आता लोदगा (जि. लातूर) येथील निर्माणाधिन वीस हजार चौरस फूट क्षेत्रातील वर्कशॉपमध्ये बांबू टिश्‍यू कल्चर लॅब, नर्सरी टेक्निक, बांबूपासून फर्निचर व इतर उत्पादने निर्मिती यावर आधारित प्रशिक्षण देणार आहे. डिझेल, पेट्रोल, दगडी कोळसा, प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम या प्रदूषण

पसरविणाऱ्या घटकांना भविष्यात पर्याय शोधण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. या सर्वांना पर्यावरणपूरक बांबू हा कसा पर्याय आहे, याचे महत्त्व पाशा पटेल हे गेल्या पाच वर्षांपासून पटवून देण्याचे काम करत आहे. त्यांच्या या चळवळीला आता केंद्र शासनाचे पाठबळ मिळाले आहे.

‘मॅनेज’ संस्थेने बांबू लागवड चळवळीत फिनिक्स फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला, ही बाब आमच्या चळवळीला हत्तीचे बळ देणारी त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाला चालना देणारी आहे. या संस्थेसोबत काम करताना बांबू टिश्‍यू कल्चर लॅब, नर्सरी टेक्निक, बांबूपासून फर्निचर व इतर उत्पादने निर्मिती यावर आधारित तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या माध्यमातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. देशातील सर्व नदीकाठी ही संकल्पना कशी साकारता येईल, याचे प्रशिक्षण प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाईल. त्यातून या सर्व गोष्टी देशपातळीवर पोहोचवण्याला प्राधान्य देऊ.

पाशा पटेल, माजी अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT