Agricultural Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी मोहीम

महावितरणने कृषिपंपांच्या थकबाकी वसुलीसाठी पुन्हा एकदा मोहीम सुरू केली असून, येत्या ३१ मार्च २०२३ पर्यंत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्याचा आणि विलंब आकार, व्याज पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

सोलापूर ः महावितरणने कृषिपंपांच्या (Agriculture Pump) थकबाकी वसुलीसाठी पुन्हा एकदा मोहीम सुरू केली असून, येत्या ३१ मार्च २०२३ पर्यंत वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्याचा आणि विलंब आकार, व्याज पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Agriculture Electricity)

पुणे प्रादेशिक विभागातील १२ लाख ५४ हजार कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी १२ हजार ६१ कोटी रुपयांवर पोहोचली असून, कृषिपंप ग्राहकांनी त्वरित वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

त्यासाठी नवीन कृषिपंप धोरण २०२० तयार केले असून, या धोरणांतर्गत ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येणार आहे.

तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. या आधीही जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत थकबाकीवर ५० टक्के सूट देण्यात आली होती. पण मध्यंतरी ही मोहीम काहीशी रखडली होती.

पण आता पुन्हा एकदा यावर महावितरणने लक्ष केंद्रित केले असून, शेतकऱ्यांना वीज बिलासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत सवलतही जाहीर केली आहे.

जिल्ह्यात पाच हजार कोटींची थकबाकी

पुणे विभागात सर्वाधिक थकबाकीदार सोलापूर मंडळात असून, त्याची संख्या तीन लाख ६८ हजार इतकी आहे. तर थकीत आणि चालू बिलाची एकूण थकबाकी ५३३८ कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर पुणे, सांगली, बारामती, सातारा, कोल्हापूर या मंडळांचा समावेश होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT