Krishi Seva Kendra Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : शेतीची कामे थांबल्याने बियाणे व खतांचे व्यवसाय ठप्प

Seed Fertilizer Market : पावसाळ्याला सुरुवात होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना एकही छोटा व मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सुरू असलेली शेतीतील कामे हळूहळू बंद पडण्यास सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Nira Narsinhpur News : पावसाळ्याने चार महिन्यानंतरही दडी मारल्याने शेती व शेतीशी संलग्न कामे थांबली आहेत. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणारे बि-बियाणे, रासायनिक खते, अवजारे, वाहन व्यवसाय ग्राहकांअभावी ठप्प पडले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर भरलेला माल ग्राहकांनी पाठ फिरवल्याने जसाच्या तसा पडून आहे.

पावसाळ्याला सुरुवात होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना एकही छोटा व मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सुरू असलेली शेतीतील कामे हळूहळू बंद पडण्यास सुरुवात झाली आहे.

तर शेतकऱ्यांनी पावसाच्या जिवावर शेतात नांगरणी, कोळपणी, रोटरी फिरविणे आदी कामे करून घेतली आहेत. उसाच्या लागवडीसाठी सऱ्या ओढून ठेवल्या आहेत. परंतु, पावसाने पाठ फिरवल्याने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन लागण करण्याचे थांबवले आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामावर ऊस उपलब्धतेची टांगती तलवार लटकून राहिली आहे.

खरीप हंगामातील पेरण्या पावसाच्या जिवावर खोळंबून राहिल्या आहेत. त्यामुळे पेरण्यांच्या तोंडावर बि-बियाणे दुकानात माल खच्चून भरला होता. परंतु, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी दुकानाकडे पाठ फिरवल्याने लाखों रुपयांचा माल न विकल्याने माल दुकानातच पडून आहे. त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जर का अशीच परिस्थिती राहीली तर मात्र शेतकरी व दुकानदारांवर आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

पावसाने दडी मारल्याने धरणे अद्यापि पन्नास टक्के रिकामीच आहेत. तशातच नीरा व भीमा नद्यांतील पाणीही आटले आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके काढण्यापर्यत तरी पाण्याची आवश्यकता आहे. जर का पाणी मिळालेच नाही तर हाता तोंडाला आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तातडीची उपाययोजना म्हणून भीमा व नीरा नद्यांमध्ये काही प्रमाणात पाणी सोडणे आवश्यक आहे.

पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर शेतातील संभाव्य मका पेरणी व ऊस मशागतीसाठी लागणारे बियाणे व खतांची उपलब्धता आम्हाला करून ठेवावी लागते. आम्ही त्याच पार्श्वभूमीवर क्रेडिटवर खते व बियाणे मागवून दुकानात ठेवलेली आहेत. परंतु, पावसाने दडी मारल्याने शेतातील सर्वच कामे ठप्प पडली असल्याने व शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने आमच्या दुकानाकडे शेतकरी फिरकत नाही. तशातच व्यापाऱ्यांनी मालाच्या पैशाचा तगादा आमच्या पाठीशी लावला आहे. आम्ही दुहेरी संकटांना तोंड देत आहे.
- वसंत तावरे, गणेशवाडी, बियाणे व खते दुकानदार
आम्हाला यावर्षी शेतातील मशागतीची कामे करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बोलविले तर काहींनी बोलावून आमच्याकडून काम करून घेतले खरे पण पैसे आल्यानंतर देतो, असे सांगितले. त्यामुळे आम्हालाही मोठ्या अडचणीला तोंड देण्याची वेळ आली आहे. वाहन व्यवसाय करायचे म्हटले तर त्याला लागणारे डिझेलला खिशातून रोख पैसे घालून उधार धंदा करण्याची वेळ आली आहे.
- ताजुद्दीन शेख

शेतकरी संकटात

शासनाच्या ग्रामविकास, महसूल, पाणीपुरवठा, कृषी विभागाने दुष्काळ संकट निवारणासाठी योग्य ते उपाययोजना करणे आवश्यक आहे. संभाव्य वसुलीही थांबवणे गरजेचे आहे. तर अडचणीत सापडलेला शेतकरी मित्राला सहकार्य करणे व त्याला संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

SCROLL FOR NEXT