Bribe News  Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Bribe News : लाचखोर खरे यांची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Arrest In Bribe : खरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी (ता. २०) त्यास पुन्हा न्यायालयात आणले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

Team Agrowon

Nashik News : बाजार समिती निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांविरोधातील सुनावणीत बाजूने निकाल देण्यासाठी तब्बल ३० लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेला जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

खरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी (ता. २०) त्यास पुन्हा न्यायालयात आणले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी (ता. १५) रात्री त्याच्या कॉलेज रोडवरील राहत्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. खरे यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात लाचखोर खरे यांच्या घरातून रोकड व सोने असे घबाड हाती लागले.

याशिवाय मालमत्तेच्या कागदपत्रांसह आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली आहेत. दरम्यान, खरे यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यास शनिवारी (ता. २०) पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे खरे यांची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली.

पथकांकडून तपास

खरे यांच्या पोलिस कोठडीदरम्यान तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुमारे पाच पथके नेमण्यात आली होती. यातील तीन पथके अजूनही सटाणा आणि इगतपुरीत लाचखोर खरे यांच्या मालमत्तेचा शोध घेत आहेत.

खरे यांच्या मालमत्तेसंदर्भात कागदपत्रे तपास पथकांच्या हाती लागली असून, त्यानुसार ही पथके शोध घेत आहेत. या आधारे खरे यांच्याविरोधात चौकशीअंती अपसंपदेचाही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अखेर मध्यवर्ती कारागृहात जावेच लागले...

लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता ते थेट आयसीयू मध्ये गेले. तेथून त्यांना आपत्कालीन विभागात आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या लाचखोर वैशाली पाटील यादेखील त्याच विभागात आल्या.

दोघांनी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे बोलले जाते. यासाठी त्यांच्यासोबत इतर ओळखीच्या लोकांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याची चर्चा होती. परंतु बराच वेळ थांबल्यानंतर त्यांना दाखल करण्याऐवजी कारागृहात सोडण्याचाच निर्णय घेण्यात आला.

अखेरीस पोलिस वाहनातून त्यांना नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहाकडे जावे लागले. दरम्यान त्यांच्या अवतीभवती असलेल्या खासगी व्यक्तींचा गराडा मात्र चर्चेचा विषय ठरला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT