Milk production Agrowon
ताज्या बातम्या

Milk Production : सकस चारा उत्पादनातून दुग्धोत्पादनाला देणार चालना

MAFSU VC : ‘माफसू’चे कुलगुरू नितीन पाटील यांची माहिती

Team Agrowon

Dr. Nitin Patil : विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : ‘‘राजस्थानसारख्या कोरडवाहू क्षेत्रात दुग्ध व्यवसाय आर्थिक समृद्धीचे कारण ठरला आहे. त्याकरिता सकस चारा उत्पादनावर भर द्यायला हवा. मात्र पशुपालनाशी संबंधित या महत्त्वाच्या बाबीकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले. आता याच मुद्द्यावर संशोधन आणि विस्तार कार्याचा फोकस ठेवत महाराष्ट्रात दूध उत्पादनाला चालना देणार आहे,’’ अशी माहिती ‘माफसू’चे नवनियुक्त कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून शुक्रवारी (ता.२८) राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

त्यानंतर त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी त्यांची संशोधन विषयक भूमिका मांडली. डॉ. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मूळचे अकोला (विदर्भ) येथील रहिवासी आहेत. शालेय आणि पशुवैद्यकीय शिक्षण याच ठिकाणी झाले. त्यानंतर पीएचडी करून ते गेल्या काही वर्षांपासून राजस्थानातील भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गतच्या कोरडवाहू क्षेत्र संशोधन संस्थेच्या पोषक चारा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत.

डॉ. पाटील यांच्या मते, राजस्थानातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात दरवर्षी दुष्काळ पडतो. परंतु त्याचा या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कोणताच परिणाम होत नाही. पशुपालन हे त्यामागील मुख्य कारण ठरले आहे. अशा दुष्काळी भागात संशोधनात्मक प्रयोगांवर भर दिला. चारा उत्पादन कसे वाढवावे, चाऱ्यावर प्रक्रिया करून टंचाईच्या काळात त्याचा वापर करण्याचे कौशल्य अशा बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. राजस्थान सारखीच दुष्काळी स्थिती किंवा कोरडवाहू क्षेत्र महाराष्ट्राच्या काही भागांत आहे. या ठिकाणी देखील दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आधी सकस चारा उत्पादन करणे गरजेचे आहे. कुलगुरू म्हणून महाराष्ट्रात दुग्धोत्पादन वाढीसाठी सकस चारा उत्पादनावर भर राहील. चांगल्या प्रतीचे व उत्पादनक्षम जनावरे तयार केले जातील.

दुग्धोत्पादन वाढीत ७० टक्के चाऱ्याचे महत्त्व आहे. त्यामुळे सकस चारा उत्पादन, प्रक्रिया करून त्याची टिकवण क्षमता वाढविणे व टंचाई काळात त्याची उपलब्धता गरजेची ठरते. शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना मिळाल्यास ग्रामीण अर्थकारण समृद्ध होईल. त्यावर येत्या काळात ‘माफसू’चा भर राहील.
- डॉ. नितीन पाटील, कुलगुरू,
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT