बैलगाडा शर्यत Agrowon
ताज्या बातम्या

Belgada Race : भुकूमला रंगणार रविवारी बैलगाडा शर्यत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता.१) रोजी भुकूम येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon



भुकूम, ता. मुळशी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता.१) रोजी भुकूम येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यती माजी सभापती स्व. तुकाराम हगवणे यांच्या स्मरणार्थ भरविण्यात येत असल्याचे नियोजन मंडळाचे माजी सदस्य राजाभाऊ हगवणे यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यतीसाठी आंग्रेवाडी येथे खास मैदान तयार करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकास दोन लाख एकावन्न हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. एकूण पहिल्या आठ विजेत्यांना रोख रक्कम व चषक बक्षीस देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणारे गाडा मालकास चषक देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर व तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी (ता.१) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत ३.५५ लाख शेतकरी

Sugarcane Workers Safety: ऊस तोडणी कामगारांबाबत हलगर्जीपणा केल्यास कारवाई

Cow Slaughter Ban Law: गोपालक शेतकरी, व्यापाऱ्यांना संरक्षण द्या; अन्यथा गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा

Flowers Farmer Struggles: शेवंती उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

National Cooperative Sugar Mill Awards: दत्त शिरोळ, क्रांती अग्रणी कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार

SCROLL FOR NEXT