Bee Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Bee Conservation : शाश्‍वत पीक उत्पादकतेसाठी मधमाश्‍यांचे संवर्धन गरजेचे

Crop Productivity : हवामान बदल हे शेतीसमोरील मोठे आव्हान असून, हवामान बदलांमुळे शेतीमधील महत्त्वाचे काम करणाऱ्या मधमाश्‍यांच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Pune News : हवामान बदल हे शेतीसमोरील मोठे आव्हान असून, हवामान बदलांमुळे शेतीमधील महत्त्वाचे काम करणाऱ्या मधमाश्‍यांच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण झाले आहे. हवामान बदलांची आव्हाने आणि कृषिविकासातून शाश्‍वत पीक उत्पादकतेसाठी मधमाश्‍यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. यामध्ये फुलशेतीचा महत्त्वाचा वाटा आहे, असे मत कानपूरच्या चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. सिंग यांनी व्यक्त केले.

पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने परागीभवनासाठी मधमाशी संवर्धन या विषयावर दूरदृश्‍यप्रणालीद्वारे आयोजित चर्चासत्राच्या उद्‍घाटनपर भाषणात डॉ. सिंग बोलत होते. या वेळी पुष्पसंशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, भारतीय कृषी संशोधन व शिक्षण परिषदेअतिरिक्त महासंचालक डॉ. एस. सी. दुबे, प्रकल्प समन्वयक डॉ. सचिन सुरवसे, केंद्रील फलोत्पादन विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि कार्यकारी संचालक डॉ. नवीनकुमार पटले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सिंग म्हणाले, ‘‘फळपिकांमध्ये फुलांचे आंतरपीक घेतल्याने परागीभवन होण्यास मदत होऊन, उत्पादकतेमध्ये वाढ होते. तसेच फळधारणा आणि फळांचा दर्जा सुधारून बाजारपेठेमध्ये त्याला चांगले दर मिळतात. फुले आणि मधमाशी हे जैवविविधतेतील महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या संवर्धनासाठी काम करण्याची गरज आहे.

शहरीकरण आणि विविध विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे परागीकरण करणाऱ्या किडींची संख्या कमी होत आहे. हे सजीव सृष्टीसाठी अतिशय धोक्याचे आहे. त्यामुळे परागीभवन करणाऱ्या किडींचे संवर्धन करणे गरजेचे आहे.’’

या वेळी डॉ. सिंग यांच्या हस्ते पुष्पसंशोधन संचालनालयाच्या वतीने विकसित केलेल्या ‘पॉलिनेटर्स ऑन फ्लॉवर क्रॉप्स : अ डेटाबेस’ याचे उद्‍घाटन करण्यात आले. याबाबत डॉ. सिंग यांनी संस्थेचे अभिनंदन केले.

तर चर्चासत्रामध्ये कोलकाता विद्यापीठाच्या डॉ. प्रतिभा बासू, भारतीय कृषी संशोधन व शिक्षण परिषदेच्या बंगळूर केंद्राचे डॉ. व्यंकटेश रेड्डी, पंतनगर संशोधन केंद्राचे डॉ. एम. एस. खान यांनी सादरीकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT