Team Agrowon
ग्रामीण भागात मधमाशीपालानातून रोजगाराच्या संधी तयार होत आहेत. मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय असून, त्यापासून शाश्वत उत्पन्न मिळू शकते. विविध वृक्ष आणि पिकांच्या परागीभवनामध्ये मधमाश्यांचा मोठा वाटा आहे.
भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये लघू अभियान I, लघू अभियान II व लघू अभियान III चा समावेश आहे.
यामध्ये शास्त्रोक्त मधुमक्षिका पालनाचा अंगीकार करून त्याद्वारे परागीकरण करून विविध पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावर भर देण्यात येत आहे. मधुमक्षिका पालनकर्त्यांची नाव नोंदणी, ट्रेसेबिलिटी प्रणाली, ब्लॉक चेन स्थापित करण्यात येत आहे.
प्रशिक्षित शेतकरी, मधुमक्षिका पालनकर्ते, उद्योजक यांच्याकडून शास्त्रोक्त मधुमक्षिकापालनाचा सुलभतेने अंगीकार, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्यावर भर देण्यात येत आहे.
या अंतर्गत पीक काढणीनंतरच्या मधुमक्षिकापालन / पोळी यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे.
या अंतर्गत विविध प्रदेश, राज्ये, कृषीविषयक हवामान आणि सामाजिक आर्थिक परिस्थितीसाठी योग्य संशोधन व विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मधुमक्षिका पालक,शेतकरी, संस्था, शेतकरी गटांनी लघू अभियान I,II,III अंतर्गत नमूद घटकांचे सविस्तर प्रस्ताव संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या कार्यालयास सादर करावेत.
या अभियानांतर्गत मधुमक्षिका संचाकरिता २००० रुपये प्रति संच प्रकल्प खर्च ग्राह्य धरून ४० टक्के प्रमाणे ८०० रुपये प्रति संच अनुदान याप्रमाणे जास्तीत जास्त ५० संचापर्यंत अनुदान देय आहे.