Dhananjay Munde Agrowon
ताज्या बातम्या

Fruit Crop Nursery : कण्हेरीतील फळरोपवाटिका देशात सुंदर, आदर्श

Dhananjay Munde : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे राज्याच्या दृष्टीने आदर्श म्हणावी लागतील.

Team Agrowon

Baramati News : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे राज्याच्या दृष्टीने आदर्श म्हणावी लागतील. बारामतीला खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. कण्हेरी येथील फळरोपवाटिका राज्यातच नव्हे तर देशात सुंदर व आदर्श असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त येथील बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित आरोग्य वारीचा सांगता समारंभ रविवारी (ता. ३०) धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील हेही उपस्थित होते. कण्हेरी येथे कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेली फळरोपवाटिका राज्यातच नव्हे तर देशात सुंदर व आदर्श असल्याचे धनंजय मुंडे यांनी नमूद केले.

कण्हेरी (ता. बारामती) येथील कृषी विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या तालुका फळरोपवाटिकेस भेट देऊन मंत्री मुंडे यांनी पाहणी केली. अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असलेले संशोधन व इतर बाबींची माहिती जाणून घेतली. तसेच कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवावे या दृष्टीने ही रोपवाटिका आदर्श असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

या दौऱ्यात कृषिमंत्री मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, शैक्षणिक संकुल येथेही भेट देऊन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असलेल्या शेतीविषयक संशोधनाची माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रासही भेट दिली व तेथील उपक्रमांची माहिती घेतली.

या दौऱ्यात कृषिमंत्री मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या अप्पासाहेब पवार वैज्ञानिक संशोधन केंद्र, शैक्षणिक संकुल येथेही भेट देऊन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असलेल्या शेतीविषयक संशोधनाची माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रासही भेट दिली व तेथील उपक्रमांची माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

Dharashiv ZP Development: सुविधा, नावीन्यपूर्ण योजनांना प्राधान्य

ASHA Workers Honorarium: गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविकांना नियमित मानधन देण्याबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले?

Wheat Harvesting Tips: गव्हाची काढणी, मळणी आणि साठवण करताना काय काळजी घ्याल?

Crop Insurance Delay: स्थगिती नसताना शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा का अडवला?

SCROLL FOR NEXT