खानदेशात केळी कमाल १०००, तर किमान दर ४०० रुपये Agrowon
ताज्या बातम्या

Banana Rate : खानदेशात केळी दर स्थिर

आवकेत सतत घट; सरासरी १२०० रुपये दर

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात केळीचे दर (Banana Rate) स्थिर असून, प्रतिक्विंटल १५०० ते ८०० रुपये व सरासरी १२०० रुपये दर आहेत. आवक मागील दोन महिन्यांत सतत घटली आहे.
पिलबाग किंवा खोडवा केळीतूनही दर्जेदार केळीची काढणी सुरू आहे. या केळीस कमाल १५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. खानदेशात सध्या प्रतिदिन ११५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला प्रतिदिन सरासरी १८० ट्रक केळीची आवक होती. या काळात परदेशात व देशातील बाजारातही केळीला मागणी (Banana) होती. यामुळे दर टिकून होते. नंतर केळीची आवक सतत कमी होत गेली.

सध्या थंडीचे दिवस आहेत. या काळात खानदेशात पिलबाग व जुनारी (काढणी ८० ते ९० टक्के पूर्ण झालेल्या बागा) बागांतून केळीची आवक होते. कांदेबाग केळीची आवक सप्टेंबर ते ऑक्टोबरअखेरपर्यंत बऱ्यापैकी होती. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आवक कमी होत गेली. यामुळे दरही टिकून आहेत. नवती किंवा मृग बागांमधून (मे ते जुलै या दरम्यान लागवडीच्या बागा) केळीची आवक सध्या सुरू नाही. ही आवक फेब्रुवारीत सुरू होईल. तोपर्यंत खानदेशात केळीची आवक कमीच राहील, असे दिसत आहे.

केळीला किमान १२००, १०००, ९०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही दर्जानुसार दिला जात आहे. दर्जेदार केळीला उत्तर भारतात मागणी आहे. तसेच राजस्थान, छत्तीसगड, राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर येथेही केळीची पाठवणूक सुरू आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची आवक सध्या प्रतिदिन १०० ते १०५ ट्रक अशीच दिसत आहे. तेथे मध्य प्रदेशसह जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, यावल, रावेर भागातून केळीची पाठवणूक केली जाते. मध्य प्रदेशातही पिलबाग केळीमधून काढणी सुरू आहे. दर मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. मागील वेळेस कोविडबाबतच्या अफवा व थंडीचा प्रकोप यामुळे केळीला मागणी कमी होती. पण यंदा केळीची आवकही कमी आहे. तसेच कोविडबाबतच्या अफवा नसल्याने दर टिकून आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT