Banana Agrowon
ताज्या बातम्या

‘किसान रॅक’ अनुदानासाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना भेटणार

गेल्या १४ एप्रिलपासून रेल्वेने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा निम्म्या भाड्याच्या अनुदानावरील किसान रॅक कोळसा वाहतुकीचे कारण पुढे करीत बंद केला होता.

टीम ॲग्रोवन

रावेर, जि. जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा (Banana Grower Farmers) किसान रॅक अनुदानावर (Kisan Rack Subsidy) पुन्हा सुरू व्हावा, यासाठी केळी उत्पादक शेतकरी २१ जुलैला दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहेत.

येथील रावेर स्टेशन फळबागायतदार युनियनचे अध्यक्ष रामदास पाटील, सचिव ॲड. आर. आर. पाटील व माजी उपाध्यक्ष हरीश गनवाणी हे या भेटीसाठी दिल्ली येथे पोचणार आहेत.

गेल्या १४ एप्रिलपासून रेल्वेने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा निम्म्या भाड्याच्या अनुदानावरील किसान रॅक कोळसा वाहतुकीचे कारण पुढे करीत बंद केला होता. मात्र या किसान रॅकचे मंजूर अनुदान संपूर्ण खर्ची पडल्याने हा रॅक बंद करण्यात आला.

हा प्रश्न केवळ निवेदन देऊन सुटणार नाही तर त्यासाठी दिल्ली येथे जाऊन संबंधित मंत्र्यांची भेट घेणे आवश्यक असल्याची अपेक्षाही केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. या शेतकरी शिष्टमंडळाची रेल्वे राज्यमंत्र्यांशी भेट खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Policy: धोरण धरसोडीची शिक्षा भोगतात उत्पादक

Jal Jeevan Mission 2.0: ‘मिशन’ फत्ते करा

Flower Farmers Crisis: यवतमधील फूल उत्पादकांचे चेहरे कोमेजले

Economy Conference: बांबू, इथेनाॅल, कार्बन हरित अर्थव्यवस्थेवर २७ पासून परिषद; पाशा पटेल यांची पत्रकार परिषदेत माहिती

Phule Tambul Product: ‘फुले तांबूल’ उत्पादनास कॉपीराइट

SCROLL FOR NEXT