Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update :मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस

पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात गेल्या पंधरवड्यात पावसाने काहीशी दांडी मारली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी मशागतीच्या कामांची गती मंदावली होती.

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या आठवड्यापासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी (Rainfall In Pune) लावली असून मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Mulshi Dam Catchment Area) मध्यम पाऊस पडला. झालेल्या पावसामुळे खरिपाच्या कामांना चांगलाच वेग आला असून काही प्रमाणात शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. (Latest Rain Update In Maharashtra)

पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात गेल्या पंधरवड्यात पावसाने काहीशी दांडी मारली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी मशागतीच्या कामांची गती मंदावली होती. शिरूर, पुरंदर, इंदापूर, बारामती खेड तालुक्यातील काही भागांत मशागती अंतिम टप्प्यात आल्या असून हलका ते मध्यम पाऊस झालेल्या ठिकाणी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. सोमवारी (ता. २७) दिवसभर झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. पुणे शहरातील अनेक उपनगरात दुपारनंतर वातावरणात बदल होऊन उपनगरात काही ठिकाणी शिडकावा झाला. शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव, बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्यांत ऊन पडले होते. काही वेळा अधूनमधून हवामान ढगाळ होत होते. पश्चिम पट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यात काही अंशी हवामान ढगाळ होत असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्याचे चित्र होते.

सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेल्या माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद मंगळवारी सकाळी आठ वाजता झाली. नीरा देवघर २० मिलिमीटर पाऊस झाला असून टेमघर १६, गुंजवणी १५, डिंभे १२, पानशेत ११, वरसगाव १० मिलिमीटर पाऊस पडला. तर पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड, कळमोडी, आंध्रा, पवना, कासारसाई, खडकवासला व उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. भाटघर, वीर, नाझरे, विसापूर, भामा आसखेड, वडीवळे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याची नोंद झाली. काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे एसआरटी पद्धतीने भात लागवड केलेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला असून भात पिकांच्या वाढीस पोषक पाऊस ठरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते.

घाटमाथ्यावरही हलका पाऊस :

पावसाने जोर धरल्याने घाटमाथ्यावरही चांगलाच पाऊस पडत आहे. लोणावळा या घाटमाथ्यावर २१ मिलिमीटर पाऊस पडला. तर वळण १०, शिरोटा ६, ठोकरवाडी ४ मिलिमीटर पाऊस पडल्याने नद्या, नाले वाहू लागले आहेत.

पुणे जिल्ह्यात १ ते २८ जून या कालावधीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

टेमघर ४१, वसरगाव ७६, पानशेत ८०, खडकवासला १६, पवना २८, कासारसाई ९९, कळमोडी ९७, चासकमान ७६, भामा आसखेड ६२, आंध्रा ६२, वडीवळे ५०, नाझरे ८८, गुंजवणी ९१, भाटघर २५, नीरा देवघर ५३, वीर ७४, पिंपळगाव जोगे १०८, माणिकडोह ११२, येडगाव १०९, वडज ९५, डिंभे १७२, चिल्हेवाडी ४३, घोड ४९, विसापूर २५, उजनी १३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

SCROLL FOR NEXT