Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Rain : पावसाची उघडीप; शेतकऱ्यांचा हिरमोड

Kharif Sowing : चालू वर्षाच्या मृग नक्षत्रात पावसाने अनेक भागात दांडी मारली, तर आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kharif Season : नाशिक : चालू वर्षाच्या मृग नक्षत्रात पावसाने अनेक भागात दांडी मारली, तर आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

तर तुलनेत पूर्व भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहिले. जिल्ह्यातील जूनचे सरासरी पर्जन्यमान १७४.४ मिमी आहे.

मात्र प्रत्यक्षात ९२.५ मिमी पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी ५३ टक्के आहे. मात्र जूनमध्ये सुरुवातीला पावसाचा जोर होता.

नंतर सोमवारी (ता. ३) व मंगळवारी (ता. ४) सलग दोन दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने उघडीत दिल्याचे दिसून आले.

जिल्ह्यातील पावसाची स्थिती अद्याप समाधानकारक नाही. सुरगाणा, इगतपुरी, पेठ, कळवण, येवला तालुक्यांत अधूनमधून हलके थेंब पडले तर पावसाने इतर भागात उघडीप दिली होती. जिल्ह्यातील पूर्व भागात पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत.

त्यामुळे शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. सुरुवातीला पाऊस सुरू झाल्यानंतर पाऊस दिलासा देईल असे वाटत होते; मात्र सलग दोन दिवस पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र पेरणे वेळेवर होतात यासाठी काही शेतकऱ्यांनी देवळा, चांदवड व येवला तालुक्यांत मका लागवड केल्याचे दिसून आले.

शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन ओलीप्रमाणे पेरण्या करत असतात. मात्र चालूवर्षी शेतकऱ्यांचे पीक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

एकीकडे सुरुवातीच्या टप्प्यात काही शेतकऱ्यांनी संरक्षित पाणीसाठ्यावर भात, नागली व वरई रोपे तयार करण्याची लगबग पश्चिम पट्ट्यात दिसून आली. मात्र पाण्याअभावी रोपे जळून जाण्याची भीती होती. अशातच पावसाने हजेरी लावल्याने या भागात मोठी संजीवनी मिळाले.

पेरण्या थांबल्या
जिल्ह्यात प्रामुख्याने भात पिकानंतर मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग या पेरण्या होतात. मात्र पेरणीयोग्य पाऊस नसल्याने पेरण्या थांबल्या आहेत.

यंदा येवला, नांदगाव भागांत संरक्षित पाणी साठ्यावर कापूस लागवडी काही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी पावसाच्या ओलीवर मका टोकन पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन सुरू केले होते; मात्र पाऊस थांबल्याने हे कामही थांबले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Google AI In Agri : गुगलकडून भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, आरोग्य आणि शिक्षणासाठी ८ दशलक्ष डॉलर्सची घोषणा

Manikrao Kokate Arrest Warrant: माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, कुठल्याही क्षणी अटक

Crop Damage Compensation: अतिवृष्टीला चार महिने उलटूनही मदत मिळेना!

Agriculture Technology: शाश्‍वत शेतीसाठी थर्मल सेन्सर्स

Samruddhi Agri Navnagar: समृद्धी कृषी नवनगर उपसमितीची बैठक घ्या

SCROLL FOR NEXT