Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : सोयाबीन, मूग, उडीदपेरणीपेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक

crop insurance : परभणी जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या ४ पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा सरंक्षित केलेले क्षेत्र हे या पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या तुलनेत अधिक आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या ४ पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा सरंक्षित केलेले क्षेत्र हे या पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या तुलनेत अधिक आहे. पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालक्यांतील पेरणीपेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, या पिकांसाठी क्षेत्र सुधार गुणांक लागू झाल्यास पीकविमा परतावा कमी दराने मिळू शकतो.

कृषी विभागाकडील माहितीनुसार, पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख ६१ हजार ८२३ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी ही ७ पिके मिळून एकूण ५ लाख १ हजार ६८ हेक्टरवरील पिके

विमा संरक्षित केली आहेत. त्यासाठी २ हजार ६१६ कोटी ४८ लाख ६४ हजार ६७ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. जिल्ह्यात शुक्रवार (ता. १८) पर्यंत ५ लाख ६ हजार १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदाच्या एकूण पेरणीक्षेत्राच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्र ५ हजार १०९ हेक्टरने कमी आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक पीकविमा अर्ज जिंतूर तालुक्यातून दाखल झाले आहेत. त्यानंतर परभणी, गंगाखेड तालुक्यांचा क्रमांक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Water Shortage: तलावांतील पाणी उपशावर निर्बंध

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’चा बॉयलर अग्निप्रदीपन

Land Survey Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला

Agriculture Production: खानदेशात उडीद, मूग उत्पादन कमी

Sugarcane Farmers Crisis: थकीत ऊसबिलांमुळे कारखान्यांसमोर ऊस मिळविण्याची मोठी कसोटी

SCROLL FOR NEXT