Crop insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पावसाच्या खंडामुळे बाधित मंडलांमध्ये अग्रिम मंजूर करा

Team Agrowon

Parbhani News : साची तूट व दीर्घ खंड यामुळे परभणी जिल्ह्यातील २५ महसूल मंडलांमध्ये १४ ते १९ दिवस पावसाचा खंड पडला आहे. परिणामी, सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट येणार आहे.

त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना देखील पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ६ हजार १७७ हेक्टर पेरणी क्षेत्रात सोयाबीनचे क्षेत्र ५२.४० टक्के, तर कपाशीचे क्षेत्र ३८ टक्के आहे. सोयाबीनचे पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे. शेंगा भरण्याची अत्यंत गरज आहे. जिल्ह्यातील यंदाची पावसाची स्थिती चिंताजनक आहे.

ऑगस्ट महिन्यात सोमवार (ता. २८)पर्यंत केवळ ७२ मिलिमीटर पाऊस झाला. जुलै -ऑगस्ट महिन्यांत परभणी, परभणी ग्रामीण, आडगाव, वाघी धानोरा मंडलांमध्ये १४ दिवस, सावंगी म्हाळसा, सोनपेठ, आवलगाव या मंडलांमध्ये १५ दिवस पावसाचा खंड पडला.

पिंगळी, बामणी या मंडलांमध्ये १६ दिवस, झरी, टाकळी कुंभकर्ण, गंगाखेड, महातपुरी, पिंपळदरी, हादगाव, मानवत, कावलगाव, पालम, देऊळगाव, चिकलठाणा, वडगाव, शेळगाव या मंडलांमध्ये १७ दिवस पावसाचा खंड आहे. रामपुरी मंडलामध्ये १८ दिवस व कासापुरी, चारठाणा या मंडलामध्ये १९ दिवसांचा खंड पडलेला आहे.

दीर्घ खंडानंतर पडलेल्या अल्प पावसामुळे पिकांना फायदा झालेला नाही. या मंडलातील पीकपरिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाच्या खंडामुळे बाधित सर्व मंडलांतील शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी वरपूडकर यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT