Washim News : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हे घटक राबविण्यात येत आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत फुले लागवड-कट फ्लॉवर्स-अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादा एक लाख रुपये प्रति हेक्टर असून अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा जास्तीत जास्त ४० हजार रुपये एवढी आहे. इतर शेतकऱ्यांची खर्च मर्यादा एक लाख रुपये प्रति हेक्टर असून अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये प्रति हेक्टर आहे.
कंदवर्गीय फुलांसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादा एक लाख ५० हजार रुपये प्रति हेक्टर असून अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा ६० हजार रुपये प्रति हेक्टर आहे. इतर शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादा एक लाख ५० रुपये प्रति हेक्टरसाठी अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा ३७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर मिळू शकते.
मसाला पीक लागवड गटात बिया वर्गीय व कंद वर्गीय पिकासाठी खर्च मर्यादा ३० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा १२ हजार रुपये प्रति हेक्टर एवढा लाभ मिळू शकेल.
बहुवर्षीय मसाला पिकांसाठी खर्च मर्यादा ५० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या ४० टक्के २० हजार रुपये प्रति हेक्टर राहील. विदेश फळपीक लागवड गटात ड्रॅगनफ्रुटसाठी खर्च मर्यादा चार लाख रुपये प्रति हेक्टर असून अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख ६० हजार रुपये प्रति हेक्टर आहे.
स्ट्रॉबेरी पिकासाठी खर्च मर्यादा दोन लाख ८० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख १२ हजार रुपये प्रति हेक्टर, अवॅकॅडो पिकासाठी खर्च मर्यादा एक लाख रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा जास्तीत जास्त ४० हजार रुपये प्रति हेक्टर व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी खर्च मर्यादा ४० हजार रुपये प्रति हेक्टर असून अनुदान मर्यादा खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रति हेक्टर आहे.
आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही अनिसा महाबळे यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.