Farm Pond Scheme
Farm Pond Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Farm Pond : वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करा ः चलवदे

Team Agrowon

नांदेड : राज्यात मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत २९ जून २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ देण्यात येईल.

‘महाडीबीटी’ पोर्टल संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.

शेततळ्यासाठी आकारमान

मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल मर्यादा रुपये ७५ हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. शेततळ्याच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाचा रक्कम निश्‍चित करण्यात आली आहे. तथापि, देय अनुदानाची कमाल रक्कम ७५ हजार रुपये इतकी राहील. रक्कम ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबंधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या ‘सोन्या’चे दर कधी वाढणार?

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

SCROLL FOR NEXT