Dhule: Online application process for animal husbandry schemes started
Dhule: Online application process for animal husbandry schemes started Agrowon
ताज्या बातम्या

Animal Husbandry Dept : ‘पशुसंवर्धन’च्या वैयक्तिक लाभ योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Team Agrowon

परभणी‌ : पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती, महिलांना लाभ घेण्यासाठी नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनांचे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास मंगळवार (ता. १३) पासून सुरुवात झाली असून ११ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज दाखल करता येतील. ऑनलाइन अर्ज https//ah. mahabms.com या वेबसाइटवर असून अँड्रॉइड मोबाईल अॅप्लिकेशन AH.MAHABMS द्वारे सुलभरीत्या अर्ज भरता येतील. पात्र लाभार्थींची अंतिम यादी ११ फेब्रुवारी २०२३ रोजी तयार होईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षायादी २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षापर्यंत म्हणजे २०२५-२६ लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकेल. लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे. १०० कुक्कुट पिल्लांचे वाटप आणि २५ अधिक ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया २०२२-२३ या वर्षात राबविली जाणार आहे. योजनांची माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आली आहे.

त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ यावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT