E-Peek Pahani Agrowon
ताज्या बातम्या

E-Peek Pahani : ई पीक पाहणीबाबत जळगाव जिल्ह्यात उदासीनता

Kharif Season 2023 : ई पीक पाहणीबाबत यंदा शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे. दोन-तीन तालुक्यांचा अपवाद वगळता इतर भागात याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : ई पीक पाहणीबाबत यंदा शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे. दोन-तीन तालुक्यांचा अपवाद वगळता इतर भागात याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. फक्त ३१ हजार हेक्टरवरील क्षेत्रावर पीक लागवड या ई पीक पाहणीत दिसत आहे.

ई पीक पाहणीसाठी अॅपमधील जुने व्हर्जन काढून नवे व्हर्जन डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक शेतकरी जुन्याच व्हर्जनवर ई पीक पाहणीचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यात अडचणी येत होत्या.

ही बाब लक्षात घेवून ९ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने पत्र जारी करून शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी व व्हर्जन - २ नव्याने डाऊनलोड करावे, अशा सूचना दिल्या. परंतु यासही प्रतिसाद मिळालेला नाही.

जळगाव जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांनी ३१ हजार हेक्टरवर पीक लागवडीसंबंधी ई पीक पाहणी केली आहे. जिल्ह्यात सात लाख ६७ हजार हेक्टरवर खरिपातील पिकांची लागवड अपेक्षित होती. यात ९ टक्के पेरणी झाली आहे. कापसाची सर्वाधिक पाच लाख ५२ हजार हेक्टरवर लागवड झाल्याचे प्रशासनाने मध्यंतरी म्हटले होते.

परंतु ई पीक पाहणीत पीक पेराच दिसत नाही. याचा अर्थ लागवड झाली आहे की नाही, हादेखील मुद्दा आहे. ई पीक पाहणीसाठी ग्रामपंचायतींच्या सहकार्याने कार्यवाही व्हावी. ग्रामपंचायतींत नियुक्त ऑपरेटरला अॅण्ड्रॉई़ड मोबाइल उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

एकाच शेतकऱ्याला २० वेगवेगळ्या क्षेत्रांवरील पीक पाहणी करता येणे या अॅपमध्ये शक्य आहे. परंतु तरीदेखील ई पीक पाहणीला प्रतिसाद का मिळाला नाही, हा प्रश्न आहे. तलाठी ई पीक पाहणीची सक्ती करीत आहेत. आपल्याला अधिकारच नाहीत, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. यात वृद्ध, निरक्षर शेतकऱ्यांची अडचण होत आहे. अपवादात्मक स्थितीत तलाठ्यांनादेखील ई पीक पाहणीचे अधिकार दिले जावेत, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.

ई पीकचा आम्हांला उपयोग काय?

पीकपाणी हवे तसे नाही. पाऊस नाही. ई पीक पाहणीचा उपयोग प्रशासनाला आकडेमोड करण्यापुरताच आहे. शेतकऱ्यांना त्याचा काय उपयोग, कुठून अॅण्ड्रॉई़ड मोबाईल आणायचा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT