Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Certification : ऊस वाहतुकीसाठी जनावरांना लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचे

‘लम्पी स्कीन’ आजाराच्या पार्श्‍वभूमीवर ऊस वाहतूक आणि ऊसतोडणी मजुरांसाठी बैलांचा उपयोग करण्यासाठी ‘लम्पी स्कीन’ लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराच्या (Lumpy SKin Disease) पार्श्‍वभूमीवर ऊस वाहतूक आणि ऊसतोडणी मजुरांसाठी बैलांचा उपयोग करण्यासाठी ‘लम्पी स्कीन’ लसीकरण (Lumpy Skin Vaccination) प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. साखर कारखान्यांना (Sugar Mill)पदवीधर पशुवैद्यक किंवा पदविकाधारकाची नियुक्ती करावी लागणार आहे, असा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosle) यांनी घेतला आहे.

नगर येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘लम्पी स्कीन’ रोगप्रतिबंधासाठी आढावा बैठक झाली. पशुसंवर्धन विभागीय प्रयोगशाळेचे उपायुक्त डॉ. हुलसुरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर, प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव आदी उपस्थित होते.

नगर जिल्ह्यातील सुमारे १३ लाख ७८ हजार ३०३ जनावरे आहेत. त्यापैकी १३ लाख ६६ हजार ९०४ जनावरांचे (९९ टक्‍के) लसीकरण झालेले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख ऊसतोडणी मजूर जिल्ह्याबाहेर जातात. पाथर्डी, कर्जत, जामखेड या तालुक्यांतील मजुरांचा जास्त समावेश आहे.

पशुविकास अधिकारी, सहायक पशुविकास अधिकारी, पर्यवेक्षक यांनी लसीकरण केल्यानंतर तत्काळ ऊसतोडणी मजुरांना प्रमाणपत्र द्यावे. ज्या ऊसतोडणी मजुरांनी प्रमाणपत्र घेतले नाही. त्यांनी पंचायत समितीतील पशुधन विकास विभागातून किंवा प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यामाध्यमातून प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी.

मुकादमांनी मजुराच्या वतीने अर्ज करून प्रमाणपत्र घेता येईल. साखर कारखान्यांनी पदवीधर पशुवैद्यक किंवा पदविकाधारकाची नियुक्ती करावी. ज्या ठिकाणी जनावरे थांबणार आहेत. त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, जंतुनाशक व कीटकनाशकांची नियमित फवारणी करावी. लम्पी स्कीन आजाराच्या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT