Milk Union Elections  Agrowon
ताज्या बातम्या

Jalgaon Dairy Election : महाजन, पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल करण्यात येणार आहे.

Team Agrowon

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी (Jalgaon Dairy Election) राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनल करण्यात येणार आहे. सर्व उमेदवार विजयी करून संघावर वर्चस्व मिळविण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांचे सर्वपक्षीय पॅनल करण्याबाबत भाजप नेते, ग्रामविकास मंत्री महाजन व पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगावात नुकतीच बैठक झाली.

जिल्ह्यातील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे, संजय सावकारे, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, कॉंग्रेसच्या चाळीसगाव येथील सुनीता पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पवार उपस्थित होते. याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले, की यंदा सर्वपक्षीय पॅनल करणाऱ्यावर चर्चा करण्यात आली. पॅनलद्वारे ताकदीने निवडणूक लढवून सर्व उमेदवार विजयी करून पॅनलचाच चेअरमन करण्याचा निर्धार करण्यात आला.

खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष...

सर्वपक्षीय पॅनलबाबतच्या बैठकीत एकनाथ खडसे व त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते. खडसेंना दूध संघाच्या निवडणुकीत रोखण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे गट करीत आहे. यामुळे खडसेंना सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीपासूनही दूर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुढे खडसे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT