Women Farmer
Women Farmer  Agrowon
ताज्या बातम्या

कृषी सचिवांनी जळगावात घेतली महिला शेतीशाळा

टीम ॲग्रोवन

जळगाव ः राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले (Eknath Dawale) यांनी केळी (Banana), कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean) आदी पिकांबाबत पिलखेडा (ता. जळगाव) येथे महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पिकांची उत्पादन (Crop Production) वाढ व इतर मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. डवले यांनी शुक्रवारी (ता. २९) जिल्ह्यातील निमखेडी (ता. जळगाव) शिवारातील केळी संशोधन केंद्राला भेट दिली. संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट दिली. तसेच केंद्रात विविध संशोधन कार्याचा आढावा घेतला.

कुकुंभर मोझॅक विषाणूबाबत (सीएमव्ही) ठोस संशोधन होण्याची गरज असल्याचा मुद्दा डवले यांनी या केंद्रात उपस्थित केला. आव्हाणे (ता. जळगाव) येथील मका पशुखाद्य केंद्रालाही भेट दिली. कानळदा (ता. जळगाव) येथे कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत रोटाव्हेटर, मळणी यंत्राचे वितरण लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात आले. केळी निर्यातीत पुढे आलेल्या करंज (ता. जळगाव) येथेही डवले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी केळी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासंबंधी कॉमन फॅसिलीटी सेंटर उभारावे तसेच केळी क्लस्टरची स्थापना करावी, अशी मागणी केली. नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव) येथेही कापूस पिकातील गुलाबी बोंड अळी नियंत्रणासंबंधी सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी डवले यांनी केली.

पिलखेडा (ता. जळगाव) येथे सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत आयोजित महिला शेतीशाळेतही मार्गदर्शन केले. शत्रू व मित्र किडींची ओळख असायला हवी. बीजप्रक्रिया महत्त्वाची आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी शेतीशाळांचे महत्त्व असल्याचेही डवले म्हणाले.

या वेळी पंचायत समितीचे सदस्य अॅड. हर्षल चौधरी, आत्माचे प्रकल्प उपसंचालक कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी, जळगाव तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, एम. जी. जंगले आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT