Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : शेती वीजपुरवठा पूर्ववत न केल्यास आंदोलन

Team Agrowon

Agriculture Electricity News इंदापूर, जि. पुणे ः तालुक्यातील कृषिपंपांचा (Agriculture Pump) थकीत वीजबिलासाठी (Electricity Bill) खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा व वीजतोडणी (Power Cut) मोहीम तत्काळ बंद करावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना देण्यात आला.

थकीत वीजबिलांमुळे वीज वितरण कंपनीने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे, परिणामी शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे पंपांचा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी इंदापूर तालुका भाजपच्या वतीने नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड शरद जामदार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य अभियंत्यांची भेट घेतली.

यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी तालुक्यामध्ये काही भागात उच्च दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता वाढवून उच्च दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी केली.

याप्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलास वाघमोडे, तानाजी थोरात, दूध संघाचे अध्यक्ष उत्तम जाधव, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.

वरिष्ठ पातळीवर बोलणार ः हर्षवर्धन पाटील

भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य अभियंत्यांशी चर्चा केली. यावेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या प्रश्नाबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणार असून निश्चितपणे यातून मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला.

आता तालुक्याचे आमदार म्हणत आहेत, की वीजजोडणी पूर्ववत न झाल्यात रस्त्यावर उतरू. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात ६ वेळा वीज तोडली होती. त्यावेळी मात्र ते मूग गिळून का गप्प होते.

- ॲड शरद जामदार, अध्यक्ष, इंदापूर भाजप

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT