Pune APMC  Agrowon
ताज्या बातम्या

Pune APMC : संचालक मंडळाच्या आदेशाला अडत्यांकडून केराची टोपली

Pune APMC Latest Update : पुणे बाजार समितीमधील फळे, भाजीपाला विभागातील डमी अडत्यांना चाप लावण्यासाठी संचालक मंडळाने प्रत्येक अडत्याने दोन मदतनीस असल्याचे प्रतिज्ञापत्र रविवार (ता.१६) अखेर सादर करण्याचे आदेश दिले होते.

Team Agrowon

Pune News : पुणे बाजार समितीमधील फळे, भाजीपाला विभागातील डमी अडत्यांना चाप लावण्यासाठी संचालक मंडळाने प्रत्येक अडत्याने दोन मदतनीस असल्याचे प्रतिज्ञापत्र रविवार (ता.१६) अखेर सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला अडत्यांनी केराची टोपली दाखवत आदेश धुडकावले आहेत. रविवारअखेर एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. यामध्ये खुद्द दोन व्यापारी संचालकांचा देखील समावेश आहे.

बाजार समितीमध्ये अनेक अडत्यांनी गाळे भाडेतत्वावर देऊन, इतर व्यवसायात आपले बस्तान बसविले आहे. तर अनेक अडते स्वतः व्यापार न करता केवळ नियमबाह्य भाडे घेत आहेत. अडत्यांच्या या बेकायदेशीर कार्यपद्धतीमुळे डमी अडत्यांचा सुळसुळाट बाजार समितीमध्ये झाला आहे.

एका एका गाळ्यावर ५ ते १० डमी अडते बेकायदेशीर काम करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी संचालक मंडळाने दोन मदतनीस ठेवण्यास मान्यता दिली आहे. या मदतनीसांचे फोटो आणि पत्त्यासह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाने अडत्यांना दिले होते. मात्र रविवारी (ता.१६) मुदतसंपली तरी एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.

मदतनीसांचे ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्रक देण्याबाबत अडत्यांना सूचना दिल्या होत्या. रविवार (ता.१६) अखेर अद्याप एकही प्रतिज्ञा पत्र आलेले नाही. सोमवार (ता.१७) पासून कारवाईची प्रक्रिया राबविण्यात येईल.
- महेंद्र काळभोर, विभाग प्रमुख, फळे भाजीपाला, बाजार समिती, पुणे.
माझ्या तीन गाळ्यांवरील ६ मदतनीसांचे प्रतिज्ञापत्र तयार आहे. ते सोमवारी (ता.१७) सादर केले जाईल.
- गणेश घुले, संचालक, पुणे बाजार समिती.
अडते असोसिएशनचे अध्यक्षच बाजार समितीचे संचालक असल्याने त्यांनी अध्यक्ष या नात्याने अडते असोसिएशनचे सामुहिक प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी आमची मागणी आहे.
- एक अडतदार.

...त्या दोन संचालकांची अडचण

डमी अडते प्रश्नावर संचालक मंडळाने निर्णय घेतला असला तरी बहुमत हे इतर गटातून आलेल्या संचालकांचे आहे. त्यामुळे बाजारातील अडते गटातून आलेल्या संचालकांची चांगलीच अडचण होत आहे. संचालक मंडळाबरोबर निर्णय झाल्यानंतर बाजारातील अडत्यांना तोंड देताना या दोन संचालकांची चांगलीच अडचण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT