ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी यंदा ४ हजारांवर जादा एसटी

दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी साधेपणाने साजरी झाली. यंदा मात्र कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः कोरोनानंतर दोन वर्षांनंतर यंदा भरणाऱ्या आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) एसटी महामंडळाने राज्यभरातून ४ हजार ७०० जादा गाड्या (Additional Bus) सोडण्याचे नियोजन केले आहे. ६ ते १४ जुलै या कालावधीतही या फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. पुणे, कोल्हापूर विभागांतून १२०० जादा गाड्या सोडण्यात येतील.

दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी साधेपणाने साजरी झाली. यंदा मात्र कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने भाविकांची संख्या वाढेल, अशी स्थिती आहे. हीच बाब विचारात घेऊन एसटी महामंडळाने दरवर्षीपेक्षा एक हजार जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार यात्रेसाठी राज्यभरातील प्रत्येक महत्त्वाच्या बस स्थानकांवर विशेष बस स्थानक स्थापन केले जाईल.

पंढरपूरमध्ये एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी चार ठिकाणी बस स्‍थानके करण्यात येतील. यात चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय), विठ्ठल कारखाना येथे बस स्‍थानके असतील. कोल्हापूर, सांगली व कोकणसाठी येणाऱ्या भाविकांना पांडुरंग बस स्‍थानकाचा वापर करता येईल. यात्रा कालावधीत संगणकीय आरक्षण सुविधा, चौकशी कक्ष, मार्गदर्शक फलक, पिण्याचे पाणी, सुलभ स्वच्छतागृह, तसेच ब्रेकडाउन व्हॅन अशा विविध सुविधा एसटी महामंडळ देईल. तसेच त्यासाठी एसटीच्या वाहतूक विभागाचे दीड हजारांवर कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT