Onion Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : कांदा अनुदानावरून सिन्नरमध्ये आरोप-प्रत्यारोप

Onion Market : सिन्नर बाजार समितीमार्फत कांदा अनुदानासाठी अर्ज केलेल्यांपैकी ७,३०३ शेतकरी पात्र ठरले असून ४०३ शेतकरी अपात्र ठरले आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

Team Agrowon

Nashik News : सिन्नर बाजार समितीमार्फत कांदा अनुदानासाठी अर्ज केलेल्यांपैकी ७,३०३ शेतकरी पात्र ठरले असून ४०३ शेतकरी अपात्र ठरले आहेत, अशी चर्चा रंगली आहे. काट्यावरील पावत्या नसणे आणि विक्रीचे कोणतेही रेकॉर्ड नसल्याने हे शेतकरी वंचित राहिले आहेत, असे बाजार समितीचे म्हणणे आहे. दुसरीकडे बाजार समितीच्या दुर्लक्षामुळेच हे शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहणार असल्याचा दावा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाने केला.

१५ ऑगस्टपर्यंत कांदा अनुदान देण्याची घोषणा विधिमंडळात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच सिन्नर तालुक्यातील सुमारे ४०३ शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. या शेतकऱ्यांना ४४ हजार ५३१ क्विंटल कांद्याचे १ कोटी ५५ लाख ८५ हजार रुपयांहून अधिकचे अनुदान मिळणार नाही.

यासाठी बाजार समितीचा कारभार जबाबदार, सत्ताधारी गटाने केलेले दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे, असा आरोप कोकाटे गटाने केला.

आधीच पावसाअभावी शेती संकटात सापडली असल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर सत्ताधारी गटाने मीठ चोळले आहे, असा आरोप समितीच्या विरोधी गटाचे संचालक संजय खैरनार, विनायक घुमरे, शशिकांत गाडे आदींनी केला.

काटा पावतीचे कारण

कांदा विक्री केल्यानंतर त्याचे वजन बाजार समितीच्या काट्यावर केले गेले. त्यामुळे काट्यावरून निघणाऱ्या वजन पावत्या शेतकरी व व्यापारी यांना दिल्या गेल्या असल्या तरी त्याचे रेकॉर्ड बाजार समितीकडेही असतेच.

अनेक शेतकऱ्यांकडील पावत्या गहाळ झाल्या असल्या तरी बाजार समितीकडे असलेल्या रेकॉर्डवरून त्या पावत्या देणे आवश्यक होते. मात्र बाजार समितीने वजन काटा पावत्या अनुदान प्रस्तावास जोडल्या नाहीत. त्याचा फटका ४०३ शेतकऱ्यांना बसल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT