Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : तंत्रज्ञानाच्या युगात अपघात हे केंद्र सरकारचे अपयश

Ajit Pawar Latest News : ओरिसामधील अपघात भीषण आहे. अशा अपघाताच्या प्रसंगी तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता.

Team Agrowon

Ajit Pawar Latest News : ओरिसामधील अपघात भीषण आहे. अशा अपघाताच्या प्रसंगी तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अशा घटनांची जबाबदारी घेऊन पाच रेल्वेमंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मग विद्यमान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा का देऊ नये, असा सवाल शनिवारी (ता. ३) संध्याकाळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी शिबिरासाठी आले असता अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ओरिसामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आणि तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर धडकल्या. शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले, त्यांचा आकडाही अद्याप पुढे आलेला नाही.

आतापर्यंत देशात अनेक रेल्वेमंत्री होऊन गेले. लालबहादुर शास्त्री यांच्यानंतर ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यासह पाच मंत्र्यांनी मोठ्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिलेले आहेत. सध्याच्या रेल्वेमंत्र्यांनीही अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. एक गोष्ट मलासुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे की, राजीनामा देऊन प्रश्‍न सुटणार नाही.

परंतु मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर खालच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते. यामध्ये जी काही सिग्नलची व्यवस्था असते. त्यामध्ये चालढकल झाल्याने हा अपघात झाला आहे. देशात बुलेट ट्रेन सुरू करण्याची तयारी सुरू आहे. वंदे भारतच्या काही रेल्वे सुरू झाल्या आहेत. आजही मुंबई ते गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार होती. परंतु या घटनेमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.

काही ठिकाणी रेल्वे रुटचे खासगीकरण करण्यात आले आहे, तो रेल्वे खात्याचा अधिकार आहे. निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, त्यांचा काहीही दोष नव्हता. सिग्नलकडे नीट लक्ष न दिल्या गेल्याने हा अपघात झालेला आहे. तंत्रज्ञानात येवढी क्रांती झालेली आहे की, आता विमान येवढेच काय तर कार चालवण्यासाठीही चालकाची गरज नसते.

कॉम्प्युटरला फिडिंग केल्यानंतर विमान किंवा कार चालते. पण या अपघातात जे निष्पाप जीव गेले, त्यात केंद्र सरकार आणि रेल्वे खात्याचे अपयश आहे, असा घणाघाती आरोप पवारांनी केला.

या अपघाताची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे आणि त्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होऊ देता चौकशी झाली पाहिजे. कुणालाही पाठीशी न घालता अपघाताची वस्तुस्थिती जनतेच्या समोर आली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT