Soybean Production Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Production : सोयाबीनमध्ये ५५ ते ७८ टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित

Soybean Crop Insurance : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व ६० मंडळात सोयाबीनच्या उत्पादनात ५५ ते ७८ टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.

Team Agrowon

Latur News : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व ६० मंडळात सोयाबीनच्या उत्पादनात ५५ ते ७८ टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विमा परतावा संदर्भातील नियमानुसार २५ टक्के अग्रिम देण्यासाठी जिल्ह्यातील एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला निर्देश दिले आहे.

लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या अवकृपेमुळे संकटाचे ढग गडद झाले आहेत. जिल्ह्यात पावसाची दांडी असल्याने हलक्या, मध्यम जमिनीतील सोयाबीनचे प्रमुख व इतरही पिकं गेल्यात जमा आहेत.

एकूणच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय संयुक्त समिती अध्यक्ष म्हणून पिक विमा परतावा नियमातील संदर्भाचा अहवाल देत शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम मत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले आहेत.

सोयाबीन पिकाच्या मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा कमी उत्पादन यंदा अपेक्षित असल्याने शेतकरी नुकसान भरपाईस पात्र असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निटूर व चाकूर तालुक्यातील शेळगाव या मंडळात अनुक्रमे ५७ व ५५ टक्के सोयाबीन उत्पादनाची घट अपेक्षित असल्याचे चित्र वगळता इतर मंडळात ६० ते ७८ टक्क्यांपर्यंत सोयाबीनच्या उत्पादनात घट येणार हे जवळपास स्पष्ट आहे.

त्यामुळे एसबीआय जनरल विमा कंपनी यांनी अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन व अधिसूचित पिकांकरिता सर्व साठ मंडळातील सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. हे पिक विमाधारक शेतकरी पिक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT