Shivrajyabhishek Sohala agrowon
ताज्या बातम्या

Shivrajyabhishek Sohala : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रेमींची अलोट गर्दी

Raigad Rajyabhishek Sohala 2023 : किल्ले रायगडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांमुळे तुफान गर्दी झाली आहे. त्यामुळे गडाचे दरवाजे बंद करण्यात आले.

Team Agrowon

Shivrajyabhishek Din 2023 : किल्ले रायगडावर आज तारखे प्रमाणे ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गडावर अडीच लाख शिवभक्त जमले आहेत. प्रचंड गर्दीमुळे गडाचा दरवाजा बंद करण्यात आला.

राजगडावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत २ जून रोजी तिथीप्रमाणे ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला होता. यानिमित्त १ ते ६ जून रोजी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज, मंगळवारी राजगडावर तारखेनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे.  

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी राजगडावर शिवभक्तांची अलोट गर्दी झाली आहे. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे. प्रशासनाने गडाचे दरवाजे बंद केले आहेत. तसेच करण्यात आला आहे. यामुळे अनेकांना गडाच्या दारवाज्यावरून माघारी फिरावे लागल्याने काही शिवभक्त नाराज झाले. वर जाण्यासाठी खाली असलेल्या नागरिकांनी घाई करू नये असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे.

गडावर गर्दी वाढू नये यासाठी रोप वे देखील बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेक नागरिकांना परत जावे लागले. गडाच्या खाली देखील हजारो शिवभक्त अद्याप गडावर जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. वाहनांना गडापर्यंत जाण्यास पहाटेपासून पोलिसांनी थांबवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT