Baramati Farmer News : तालुक्यातील ढेकळवाडी गावचे शेतकरी अशोक सुदाम घुले व त्यांच्या पत्नी मंगल घुले यांना स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजवंदन समारंभासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून दोन दाम्पत्यांची निवड या समारंभासाठी करण्यात आली आहे. त्यात बारामती तालुक्यातील घुले दाम्पत्याचाही समावेश आहे.
ही योजना सुरू झाल्यापासून अशोक घुले यांना या महिन्यापर्यंत नियमितपणे १४ हप्त्यात पैसे बँकेच्या खात्यात जमा झालेले आहेत. या मिळालेल्या पैशांचा विनियोग कसा केला, या बाबत घुले यांच्याकडे शासकीय स्तरावरून विचारणा झालेली होती.
घुले यांनी दर महिन्यात मिळालेल्या दोन हजार रुपयांत शेतीशी संबंधित सामान खरेदी केलेले होते. यात बियाणे, खते, कीटकनाशके यांचा समावेश होता.
त्यांच्या या योजनेतील पैशांचा विनियोग उत्तम रीतीने झाला व या पैशातून त्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत झाली या निकषमामुळे त्यांची विशेष पाहुणे म्हणून निवड झाली आहे.
घुले यांच्याकडे साठ गुंठे जमीन असून त्यात त्यांनी उस व चारा पिकांची लागवड केली आहे. त्यांच्याकडे शेळ्या, गाई, म्हशी असे पशुधन असून दोघे पती पत्नी शेतात काबाडकष्ट करतात. रविवारी (ता. १३) ते स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
शेतकऱ्याला सन्मान याचा आनंद माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याला थेट स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळते आहे याचा आनंद आहे. या योजनेतील पैशांचा विनियोग मी शेतीसाठीच केला होता.- अशोक घुले, बारामती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.