Nanded News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यात वैयक्तिक घटकासह शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटासाठी विविध योजनांवर मार्च अखेर ९७ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा) तीन टप्प्यांमध्ये ३८४ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत गावात वैयक्तिक घटकासह शेतकरी उत्पादक कंपनी तसेच गटांना योजनेनुसार अनुदान दिले केले जाते.
नांदेडमध्ये आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक वृक्षारोपण, फळबाग लागवड, पॉलिहाउस, शेडनेट हाउस, शेडनेटसह फ्लॉवर, भाजीपाला लागवड, रेशीम, मधमाशी पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, इतर कृषी आधारित उद्योग, गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट मिळते.
शेततळे, फील्ड अस्तर, विहिरी, ठिबक संच, फ्रॉस्ट संच, पंप संचासाठी २० हजार ६८२ शेतकऱ्यांना ८४७ कोटी ५९ लाखांचे अनुदान देण्यात आले.
शेतकरी उत्पादक कंपन्यांना, शेतकरी गटांना कृषी उत्पादनासाठी ६० टक्के आर्थिकसाह्य कृषी अवजारे बँकांसाठी, बँकांद्वारे मूल्यांकन केलेल्या व्यवसाय प्रस्तावांना कृषी उत्पादनासाठी हवामान अनुकूल उदयोन्मुख मूल्य साखळी बळकटीकरण अंतर्गत १३ कोटी २८ लाख चार हजारांचे अनुदान दिल्याची माहिती रविशंकर चलवदे यांनी दिली.
शेती नसलेल्यांनाही आधार
या प्रकल्पात भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता महिला, घटस्फोटित महिला आणि अनुसूचित जाती, जमातींमधील महिला शेतकरी यांना घरातील शेळीपालन आणि कुक्कुटपालनाचा लाभ मिळतो.
या प्रकल्पांतर्गत हवामानाला अनुकूल वाणांचे बीजोत्पादन, बियाणे प्रक्रिया उपकरणे, बियाणे सुकवण्याचे आवार, बियाणे साठवण गोदाम यासाठी आर्थिक साह्य दिले जाते.
प्रकल्प अंतर्गत गावांमधील लहान, सूक्ष्म-उत्पन्न शेतकरी (२ हेक्टरपर्यंत जमीन असलेले) आणि भूमिहीन कुटुंबांना वैयक्तिक लाभाच्या वस्तूंसाठी ७५ टक्के आर्थिक साह्य दिले जाते. तसेच २ हेक्टरपेक्षा जास्त परंतु ५ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक फायद्यासाठी ६५ टक्के आर्थिक साह्य दिले जात असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.