Debit Relief : AgrowonAgrowon
ताज्या बातम्या

Debit Relief : साडेआठ हजार शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट

Team Agrowon

यवतमाळ : राज्य सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने (debt relief plan) अंतर्गत दोन लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाने साडेआठ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे.

अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी शासनाने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली. कर्जमाफीसोबत जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यातून एक लाख १५ हजार ३५६ कर्जखात्यांची माहिती पाठविली होती.

त्यातील ६५ हजार ३६४ शेतकऱ्यांची पहिली यादी प्राप्त झाली होती. यानंतर आता तिसरी आठ हजार ५०८ शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. या शेतकऱ्यांना आता आपले सेवा केंद्रात जावे लागणार आहे. या ठिकाणी यादीतील युनिक क्रमांक किंवा आधार क्रमांक दाखवून आधार प्रमाणिकरण करावे लागणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क सेवा केंद्रांना द्यावे लागणार नाही. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बचत खात्यात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक अडचणी आल्यात. त्यातच अतिवृष्टीने शेतकऱ्यांना यंदा गारद केले. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना मदत आल्याने शेतकऱ्यांना समाधान मिळणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झालेली यादी ग्रामपंचायत, चावडी, तहसील, उपनिबंधक कार्यालय येथे प्रसिद्ध केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नियमित कर्ज भरणारे शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत होते. निधी मिळाल्याने शेतकऱ्यांना यंदा आधार मिळाला आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. यात आठ हजार ५०८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी कर्ज खात्याच्या आधार प्रमाणीकराची प्रक्रिया पूर्ण करावी. - नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT