Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : अकोला जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सरासरीच्या ७६ टक्के कमी पाऊस

Latest Rain Update Akola : पश्‍चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ७६ टक्के, तर बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात सुमारे ६० टक्के पाऊस कमी झाला आहे.

Team Agrowon

Akola News : पश्‍चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ७६ टक्के, तर बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात सुमारे ६० टक्के पाऊस कमी झाला आहे. या तिनही जिल्ह्यात मोठा खंड पडल्याने खरीप हंगामाची स्थिती बिकट झाली आहे. या खंडामुळे पीक उत्पादनाला प्रचंड फटका बसण्याची शक्यता वाढली आहे.

यंदाच्या हंगामात जून महिन्यात कमी पाऊस झाल्याने जुलैत पेरण्या सुरू झाल्या. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने सर्वदूर पेरणी झाली. मात्र, कुठे पीक वाढीच्या, तर कुठे पिकावर फुलोरा स्थिती असताना पावसाचा खंड पडला. या खंडामुळे कपाशीची वाढ खुंटली.

फुलोऱ्यात आलेल्या मूग, उडीद, सोयाबीनच्या झाडांवर फुले गळून पडली. सुमारे ५० ते ६० टक्के फूलगळ झाली आहे. यामुळे साहजिकच उत्पादनात घट येणार निश्‍चित झाले आहे. ऑगस्टमध्ये अकोला जिल्ह्यात २१२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ ४९ मिमी झाला. बुलडाणा जिल्ह्यात १९५ च्या तुलनेत ७७ तर वाशीम जिल्ह्यात २१६ च्या तुलनेत ८६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

पिके सुकू लागली

जिल्ह्यात पावसाचा खंड अनेक ठिकाणी २५ दिवसांच्या पुढे गेला. यामुळे हलक्या जमिनीवरील पिके जागेवरच सुकू लागली आहेत. सोयाबीनच्या झाडांवर फुले लागली होती. या काळात आर्द्रता न मिळाल्याने फूलगळ झाली. मूग, उडदाची लागवडच यंदा कमी आहे. जे पीक लागवड झाले त्याला कमी पावसामुळे शेंग धारणा होऊ शकलेली नाही. कोरडवाहू पट्ट्यातील कपाशी वाढ खुंटलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT