Team Agrowon
पावासाळा संपत आला आहे. जून महिन्यात पावसाने दडी दिली तर जुलैमध्ये थोडासा पाऊस पडला
सप्टेंबर मध्ये पावसाला पोषक हवामान प्राप्त झालं आहे.ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी दिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात मात्र पावसासाठी पोषक हवामान होत आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ झाली.
उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला असताना पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात विजांसह पाऊस पडण्याचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.